Big Boss Season 16 | तिने खूप लोकांची घरे तोडण्याचा प्रयत्न केलाय; श्रीजिताचे टीना दत्तावर गंभीर आरोप…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील खूप गाजलेला शो म्हणून ख्याती असलेल्या बिग बॉसमध्ये (Big Boss Season 16) रोज काही ना काहीतरी कारणावरून सतत भांडण सुरू असते. त्यातच अगदी घरात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून टीना दत्ता आणि श्रीजिता डे यांचे फारसे पटत नव्हते. त्या नेहमी एकमेकींसोबत भांडताना दिसल्या. त्यातच आता बिग बॉसचा (Big Boss Season 16) एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये श्रीजिता टीना दत्तावर गंभीर आरोप करताना दिसत आहे.

 

बिग बॉसच्या (Big Boss Season 16) या प्रोमो व्हिडीओमध्ये श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा एकमेकींशी बोलताना दिसत आहेत. त्यात श्रीजिता सौंदर्याला म्हणत आहे की, ‘ती मुलांच्या अटेंशनशिवाय राहूच शकत नाही. तिने खूप लोकांची घरे तोडण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यामुळेच आत्तापर्यंत स्वतःचा संसार करू शकली नाही. ती आतून एवढी दुःखी आहे की ती लोकांचे पाय खाली खेचून त्यातून आनंद घेते.’

दरम्यान हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
यावरून नेटकरी श्रीजिताला चांगलचं सुनावताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तरी श्रीजिताला टीना दत्ता आवडत नसली तरी एका नॅशनल टेलिव्हिजनवरील मुलीच्या व्यक्तिरेखेबद्दल अशा गोष्टी बोलू नयेत. (Big Boss Season 16) श्रीजिताच्या या वागण्याला नेटकरी चुकीचे असल्याचे बोलत आहेत. पण आता टीना दत्ताला श्रीजिताच्या या वक्तव्याबद्दल समजल्यावर टीनाची रिऍक्शन काय असणार हे पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना लागली आहे.

 

दरम्यान टीना आणि श्रीजिता यांनी एका वाहिनीवरील मालिकेत एकत्र काम केले आहे.
त्या दोघींनी जवळपास तीन वर्ष एकत्र काम केले आहे. त्यानंतर काही गोष्टींवरून या दोघींमध्ये मतभेद झाले होते.
मात्र दिवसेंदिवस त्यांचे हे मतभेद वाढतचं चालले असून आता त्या दोघीदेखील
याबाबत बिग बॉस (Big Boss Season 16) या मालिकेत एकमेकींविरोधात बोलताना दिसतात.
त्यातच आता श्रीजिता टीनाला ‘हाऊस ब्रेकर’ म्हटल्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटणार आहे.

 

Web Title :- Big Boss Season 16 | she has tried to break many peoples houses sreejeita day serious allegations against tina dutta in bigg bigg houde 16

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…

MP Supriya Sule | ‘धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे’ – खा. सुप्रिया सुळे

Bank Holidays January 2023 | नवी वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या, जाणून घ्या किती दिवस राहणार बंद