मद्रास ‘हायकोर्टा’कडून एआर रहमानला मोठा दिलासा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान यांना मोठा दिलासा देत मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसीला बुधवारी स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अनिता सुमंत यांनी अंतरिम आदेश पारित करत चेन्नईच्या जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांकडून १७ ऑक्टोबर २०१९ रोजी बजावलेल्या नोटीसीचे कामकाज ४ मार्चपर्यंत स्थगित केले गेले आहे.

रहमान यांच्यावर ६.७९ कोटी रुपयांचा GST न भरण्याचा आरोप
एआर रहमान यांच्यावर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटी कमिशनरने सेवा कर न भरल्याचा आरोप केला होता, त्यांनी रहमान यांना एप्रिल २०१३ ते जून २०१७ या कालावधीत ६.७९ कोटी रुपये सेवा कर आणि दंड म्हणून अजून ६.७९ कोटी रुपये भरण्याची सूचना केली होती.

दरम्यान रहमान म्हणाले की आयुक्तांनी त्यांच्या उत्पन्नाचा चुकीचा अंदाज लावला आहे, कारण ते फक्त ध्वनी रेकॉर्डिंग सेवेसाठी कर भरत होते. कारण कॉपीराइटचे कायमस्वरुपी हस्तांतरण करात येत नाही, एक संगीतकार कॉपीराइट कायद्यांतर्गत आपल्या कामासाठी कॉपीराइटचा परिपूर्ण मालक बनतो आणि त्यानंतर चित्रपट निर्मात्यांना या कॉपीराइटच्या अधिकारांचे कायमस्वरुपी हस्तांतरण आणि करातून सूट मिळते. न्यायालयाने रहमान यांचा हा युक्तिवाद स्विकारत जीएसटी नोटीसला स्थगिती दर्शविली आहे.

रहमान यांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत
रहमान यांना त्यांचा चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’ साठी दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ते ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय संगितकार आहेत. रहमान यांना या व्यतिरिक्त एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब, ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार आणि दक्षिणेतील १३ फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त आहेत.