सर्वसामान्यांना झटका ! लवकरच वाढतील एसी-फ्रिज सारख्या कंझ्युमर अप्लायन्सेसच्या किंमती, जाणून घ्या किती होणार वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे अगोदरच आर्थिक आव्हानांचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांना आता आणखी एक झटका बसणार आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिय सर्व्हिसेसच्या रिपोर्टनुसार, कमोडिटीच्या किंमती वाढल्याने जुलै 2021 पासून कंझ्युमर अप्लायन्सेस 10-15 टक्केपर्यंत महाग होऊ शकतात. कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनमुळे कंझ्यूमर ड्युरेबल्ससह अनावश्यक आयटम्सची विक्री सध्या बंद आहे. तर, कमोडिटीच्या किंमतीत वाढ होत आहे.

ग्लोबल कमोडिटी प्राईसेसमध्ये यावर्षी झाली वाढ
अप्लायंन्सेस बनवणार्‍या कंपन्यांनी आणि काही कंपोनन्ट्स बनवणार्‍या कंपन्यांनी काही कंपोनंन्ट्सची कमतरता आणि मेटलच्या ग्लोबल प्राईस वाढल्याने फेब्रुवारी 2021 मध्ये प्रॉडक्सच्या किंमती वाढवल्या होत्या. आता लॉकडाऊनमुळे या कंपन्यांची विक्री खुप घटली आहे. रिपोर्टनुसार, यावर्षी ग्लोबल कमोडिटी प्राईसेसमध्ये वाढ झाली आहे.

कोअर कमोडिटी सीआरबी इंडेक्स एप्रिल 2021 मध्ये वर्ष दर वर्ष आधारावर 70 टक्के वाढला आहे. यामुळे कंझ्युमर ड्यूरेबल्स इंडस्ट्रीवर परिणाम होईल. सीकेएस स्मार्ट इक्विटीचे कंझ्युमर गुड्स अ‍ॅनालिस्ट वरुण खोसला यांनी म्हटले की, कंझ्युमर गुड्सची डिमांड खुप कमी आहे. याउलट कच्चा मालाचा खर्च वाढत आहे. इंडस्ट्री किंमती वाढवण्यासाठी एक महिन्यांची वाट पाहू शकते. अखेर वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकावाच लागेल.