‘या’ 8 जणी आहेत बिग बॉसच्या सर्वात ‘ग्लॅमरस’ कंटेस्टेंट्स, ज्यांच्या हॉटनेसने चाहते झाले ‘क्लीन बोल्ड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस असा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो आहे जिथे अनेक ग्लॅमरस स्पर्धकांनी आपल्या स्टाईल आणि सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. या ग्लॅमरस दीवाजची स्टाईल आणि फॅशन पाहण्यासारखी होती. बिग बॉसच्या आतापर्यंत सर्वात ग्लॅमरस स्पर्धकांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ज्यांनी आपल्या स्टाईलने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

1) जसलीन मथारू – बिग बॉस 12 मध्ये आपल्या ग्लॅमरस लुकने प्रेक्षकांना वेडं करणारी जसलीन मथारू एक फॅशनिस्ट आहे. सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो गाजत असतात. तिचा प्रत्येक लुक चाहते कॉपी करत असतात.

2) हिना खान – टीव्हीवरील संस्कारी बहूची भूमिका साकारणाऱ्या हिना खानला जेव्हा प्रेक्षकांनी बिग बॉसमध्ये पाहिले तेव्हा ते पहातच राहिले. हिनाची स्टाईल खूपच चर्चेत राहिली. प्रत्येकजण तिचा चाहता झाला. अनेकांनी तिला स्टाईल आयकॉनचा किताबही दिला.

3) लोपामुद्रा राऊत – बिग बॉस सीजन 10 मधील सर्वात हॉट स्पर्धक म्हणून लोपामुद्रा राऊत ओळखली जाते. मिस युनायटेड कॉन्टिनेंटल 2016 मध्ये सेकंड रनरअप राहिलेल्या ब्युटी क्वीन लोपामु्द्राने शोमध्ये आपला ग्लॅमरस अवतार दाखवला आहे. बिग बॉसच्या घरातही लोपामुद्राच्या स्टाईल आणि कपड्यांची खूपच चर्चा झाली होती.

4) मंदाना करिमी – बिग बॉस 9 मधील स्पर्धक मंदाना करिमी शोमध्ये आपल्या बिंधास्त अंदाज आणि बोल्ड लुकसाठी खूप चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात बिकीनी घातल्याने मंदानाला काहींनी ट्रोलही केलं. परंतु तिने कोणाचीही पर्वा केली नाही.

5) करिश्मा तन्ना – टीव्ही अ‍ॅक्ट्रेस करिश्मा तन्ना बिग बॉसच्या आठव्या सीजनमध्ये दिसली होती. शोमध्ये उपेन पटेल व्यतिरीक्त तिचं मेकअपवरील प्रेम सर्वांनीच पाहिलं. करिश्माची स्टाईल लोकांना खूपच आवडली.

View this post on Instagram

Hello Sunday!!! 🌞 #pool #swimming #waterbaby

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on

6) गौहर खान – बिग बॉस 7 ची विनर अ‍ॅक्ट्रेस गौहर खान नेहमीच आपल्या स्टायलिश आणि बोल्ड लुकसाठी चर्चेत राहिली. शोमधील गौहरची अदा, कपडे आणि लुक्स चाहत्यांना खूपच आवडले.

7) सना खान – सना खानला बिग बॉसमधील सर्वात सुंदर स्पर्धकांच्या यादीत समाविष्ट केलं जातं. 50 हून अधिक जाहिरातींमध्ये काम करणारी सना खान बिग बॉस 6 मध्ये दिसली होती. या शोमधील तिचे सौंदर्य आणि फॅशनची खूपच चर्चा झाली. सलमाननेही अनेकदा तिचे कौतुक केले आहे.

8) सनी लिओनी – आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असणारी सनी लिओनी बिग बॉसमध्ये दिसणं चाहत्यांसाठी एक ट्रीटच होती. बिग बॉसच्या घरात सनीने आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुकने प्रेक्षकांना वेड लावलं. सनीच्या लुक आणि अंदाजाने प्रभावित होत महेश भट्ट यांनी तिला आपल्या सिनेमात कास्ट केलं.

 

You might also like