Bigg Boss 16 | ‘या’ स्पर्धकाच्या जातीवाचक टिप्पणीमुळे ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांना नोटीस

पोलीसनामा ऑनलाइन : Bigg Boss 16 | सध्या कलर्स टीव्हीवर’ बिग बॉस हिंदी’ चे 16 वे पर्व धुमाकूळ घालत आहे. दररोज या ना त्या कारणाने हा कार्यक्रम चर्चेत आहे. त्याचबरोबर स्पर्धक देखील त्यांच्या खेळीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.आता बिग बॉसचे शेवटचे काही दिवस राहिले असतानाच आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शोमध्ये एका स्पर्धकांनी जातीवाचक टिप्पणी केल्यामुळे कार्यक्रमाच्या निर्मात्यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने National Commission for Scheduled Castes (NCSC) नोटीस पाठवली आहे. (Bigg Boss 16)

28 डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात विकास मनकतला आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसले. विकासने अर्चनाला जातीवाचक टिप्पणी केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. विकासने अर्चनाला खालच्या जातीचे लोक असे म्हणून संबोधले होते. त्याचे हे बोलणे एससी/एसटी कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याचा निर्णय घेतले गेले पाहिजे यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या कार्यक्रमांच्या निर्मात्यासह कलर्स टीव्ही, एंडेमोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, वायाकॉम18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही नोटीस जाहीर करण्यात आले आहे. (Bigg Boss 16)

तर या नोटीसात संबोधण्यात आले आहे की येत्या सात दिवसात कलर्स टीव्हीने आणि शोच्या निर्मात्यांनी या नोटिसीचे उत्तर द्यावे. त्याचबरोबर या घटनेची तारीख, तपशील आणि इतर माहिती देखील देण्याचे सांगितले आहे. जर या गोष्टी वेळेवर दिले नाही तर पुढील कारवाई केली जाईल असेही नोटीस मध्ये लिहिले गेले आहे.

Web Title :- Bigg Boss 16 | National Commission for Scheduled Castes (NCSC) sent notice to bigg boss producers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi Mother Heeraben Death News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे 100 व्या वर्षी निधन

Brazil Football Legend Pele Dies At 82 | महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात राडा घालणार्‍यांना पोलिसांनी पाठलाग करुन ‘धु धु धुतले’