Bigg Boss -16 | बिग बॉसच्या घरात सतत इंग्रजी बोलल्याने निम्रत आणि सौंदर्याला दिली शिक्षा, देशाला उद्देशून म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस-16 (Bigg Boss 16) इतर सर्व सीझन पेक्षा वेगळा ठरत असून यावेळी बिग बॉस खूप सक्रिय आहे. घरातील नियम तोडणार्‍यांना कठोर शिक्षा केली जात आहे. हा हिंदी शो असल्याने बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात इंग्रजी बोलण्यास मनाई आहे. पण काहीजण सतत इंग्रजी बोलतात (Speak English), त्यांना वेळोवेळी बिग बॉस समज देतात. पण सीझनेमध्ये मात्र बिग बॉसने थेट शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात सध्या निम्रत कौर अहलुवालिया (Nimrat Kaur Ahluwalia) आणि सौंदर्या शर्मा (Soundarya Sharma) सतत इंग्रजीतच जास्त बोलत असतात. बिग बॉसच्या घरात फक्त हिंदी बोलण्याचा (Speak Hindi) नियम दोघेही तोडत असतात. आता त्यांच्या या कृतीवर बिग बॉस त्यांना धडा शिकवणार आहेत. कलर्स चॅनलने (Colors Channel) त्याचा प्रोमो शेअर केला आहे.

या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत की, या दोघी भारतात मोठ्या झाल्या तरी यांना हिंदी येत नाही? हिंदी शोमध्ये येऊन हिंदी बोलायला लाज वाटते का? त्यामुळे बिग बॉस या दोघीना आजपासून केवळ हिंदीतच बोलायचे अशी आज्ञा देत आहेत. सोबत एक टास्क देत आहेत.

या टास्कमध्ये निम्रत आणि सौंदर्या हात जोडून भारताची माफी मागत आहेत. त्या म्हणतात, भारत मे हिंदी शो मे आयी हू, पर मुझे हिंदी नही आती. मुझे माफ करो. शिवाय सर्वांना पुन्हा एकदा इंग्रजीत संवाद साधायचा नाही अशी ताकीद दिली जाते. आता शिक्षा करूनही त्या पुन्हा इंग्रजीत बोलतील का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

 

Web Title :- Bigg Boss -16 | nimrit kaur and soundarya sharma get punished for speaking in english

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात अमृता फडणवीस; सदस्यांनी विचारले प्रश्न, म्हणाल्या – ‘हे आहेत महाराष्ट्राचे दोन कॅप्टन’

NCP MLA Nilesh Lanke| राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Kishori Pednekar | उद्धव ठाकरे उशिरा का होईना दौऱ्यावर गेले, किशोरी पेडणेकरांचा शिंदे-फडणवीसांना टोला