Bipasha Basu | 9 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले नसले तरी बिपाशा जगते लग्जरी आयुष्य; कोट्यवधी रुपयांची मालकीण

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा एक काळ गाजवणार अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) ही आता अनेक वर्षांपासून सिनेविश्वापासून लांब आहे. बिपाशा बासूने अनेक हिट चित्रपट बॉलीवुडला दिले आहेत. मात्र मागील 9 वर्षांपासून अभिनेत्री बिपाशाने (Bipasha Basu) कोणताही चित्रपट केलेला नाही. तरी देखील बिपाशा लग्जरी आयुष्य (Bipasha Luxury Life) जगत असून अगदी करोडो रुपयांची ती मालकीण आहे. अनेक वर्षे काम केले नसले तरी तिच्या लाईफ स्टाईलमध्ये, फॅशनमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

अभिनेत्री बिपाशा बासू ही एक प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आहे. आज ती कोणताही चित्रपटात झळकत नसली तरी तिचा अजूनही मोठा चाहता वर्ग आहे. ती सध्या तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोहर (Karan Singh Grover) व त्यांची मुलगी देवी सोबत आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावरही बिपाशा सक्रिय असून तिची मोठी फॅनफॉलोविंग आहे. बिपाशा आपल्या लग्जरी आयुष्याचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. मात्र तिच्या चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की अनेक वर्षे काम न करता देखील ती असे आयुष्य कसे जगत आहे. याचे कारण म्हणजे बिपाशा अगदी वयाच्या 17 वर्षांपासून या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली आहे. तिचा प्रवास लवकर सुरु जरी झाला असला तरी सुरुवातीला तिच्या सावळ्या रंगांमुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

अभिनेत्री बिपाशा बासू हिने 2001 साली ‘अजनबी’ या चित्रपटामधून (Ajnabi Movie) मनोरंजन विश्वामध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2002 साली तिने सुपरहिट हॉरर ‘राज’ चित्रपटामध्ये (Raaz Movie) महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या या चित्रपटामुळे बिपाशा सर्वत्र प्रसिद्ध झाली. बिपाशाचे करिअर नवीन उंची गाठत गेले. बिपाशाने धूम (Dhoom), रेस (Race), फिर हेरा फेरी (Phir Hera Pheri), नो एंट्री (No Entry), जिस्म (Jism), हमशकल (Humshakal) यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ती शेवटची 2015 साली ‘अलोन’ चित्रपटामध्ये (Alone Movie) झळकली होती. आता बिपाशाची एकूण मालमत्ता (Bipasha Basu Property) 15 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 111 कोटी रुपये आहे. आजही तिची करोडोमध्ये कमाई आहे. तिचा पती अभिनेता करण सिंह ग्रोहर यांची मालमत्ता 15 कोटी रुपये आहे.

बिपाशाने अनेक हिट चित्रपट तर दिलेच त्याचबरोबर अनेक ब्रॅंडसोबत काम देखील केले आहे. तिने आत्तापर्यंत अॅरिस्टोक्रॅट लगेज (Aristocrat luggage), फा डिओडोरंट (FA Deodorant), गिली ज्वेलरी (Gili Jewellery), कॅडिला शुगर फ्री गोल्ड (Cadilla Sugar Free Gold), हेड अँड शोल्डर शॅम्पू (Head and Shoulder Shampoo) यांसह अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे. या शूटमधून बिपाशाने करोडोंची कमाई केली आहे. बिपाशाने स्टेज शो मध्येही तिचा जलवा दाखवला आहे. ती एका स्टेज शो साठी अंदाजे 2 करोड रुपये (Bipasha Basu Fees) घेते. तिच्या या जबरदस्त मानधनामुळे अज बिपाशा (Bipasha Basu) सिनेविश्वापासून लांब असली तरी करोडो रुपयांची (Bipasha Basu Networth) मालकीण आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | काय द्यायचे ते द्या..! लाच स्वीकारताना दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला लिपीक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | कुत्र्याच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्युबाबत जाब विचारणार्‍या महिलेचा विनयभंग; कोरेगाव पार्कमधील घटना

Kiara Advani | कियारा अडवाणीला व्हायचे होते लग्नाआधीच प्रेग्नेट; बोलून दाखवली इच्छा

Pune Crime News | लोहियानगरमध्ये तरुणाचा गळा दाबून केला खून; तीन ते चार दिवसांपूर्वी खून केल्याचा संशय

Sharad Pawar to Attend Event Honoring PM Modi in Pune Despite Political Criticism