Bipasha Basu Instagram Photo | बिपाशा बासूने शेअर केला ऑपरेशन थिएटरमधला फोटो..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सध्या सोशल मीडियावर बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवरची एक पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे (Bipasha Basu Instagram Photo). बिपाशा आणि करण सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या लाडक्या लेकीचे फोटो इंटरनेटवर शेअर करतात. मात्र सध्या त्यांच्या एका फोटोने नेटकऱ्यांच चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे (Bipasha Basu Instagram Photo).

सोशल मीडियावर बिपासा बासूने एक फोटो शेअर केला आहे. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबरला तिच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. त्यामुले तिच्या मुलीच्या वाढदिवसासाठी ही पोस्ट शेअर केली आहे (Bipasha Basu Baby Girl). तिनं डिलिव्हरीच्या वेळेस ऑपरेशन रूममधला हा फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये (Bipasha Basu Viral Photo) बिपाशा सोबत तिची गोंडस लहान नवजात परी आणि पती करण सिंग ग्रोवर दिसत आहे. हा फोटो तिच्या डिलिव्हरीनंतर लगेच काढला असून, तिचे डोळे मिटलेले दिसत आहे (Bipasha Basu Instagram Photo).

बिपाशाने शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, “जन्माची जादू… 9 महिने आईच्या पोटात राहिल्यानंतर, आज देवी 1 वर्षाची झाली आहे. ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ आहे. छोट्या देवी सोबत पुढे अनेक एडव्हेंचर्स करायचे आहेत. देवीच्या भोवती जादुई गोष्टी असाव्यात असं मला नेहमी वाटत.
आज दिवाळी आणि तिचा वाढदिवस पण आहे. ती आईची मिष्टी आहे.
आमची लक्ष्मी देवी… सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि देवीला खूप प्रेम दिल्याबद्दल सर्वांचे आभार.”

दरम्यान, अलीकडेच अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) रॅम्पवॉल्क करताना दिसली.
सध्या ती चित्रपटसृष्टी पासून लांब असून, ती आपल्या लहान देवीसोबत जास्त वेळ घालवत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

संजय राऊतांनी काढली एकनाथ शिंदेंची औकात, म्हणाले – ‘हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांना…’