Birthdays on 23 January : आज वाढदिवस असणाऱ्यांसाठी कसं असेल येणारं वर्ष ? जाणून घ्या भविष्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अ‍ॅक्टर रवी दुबे याचा आज वाढदिवस आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे. अशा सर्व व्यक्तींसाठी येणारं वर्ष कसं असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत.

मंगळ ग्रह हा या वर्षाचा स्वामी आहे. चंद्राच्या विशिष्ठ स्थितीमुळं तुमच्या कष्टांना चांगलं फळ मिळणार आहे. बौद्धिक प्रयत्नांनाही इच्छित फळ मिळेल. काही व्यक्तींना 19 जानेवारी पासून ते फेब्रुवारी दम्यान अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात या वर्षी मंगळ ग्रह तुमच्या कर्मावर प्रभुत्व गाजवेल. हीच स्थिती मे महिन्यापासून ते 28 जून पर्यंत कायम राहिल. यावर्षी जुलै ते ऑगस्ट पर्यंतचा काळ नवीन व्यापारी कार्यांसाठी अनुकूल आहे. सप्टेंबर नंतर पुरुषार्थ आणि बुद्धीमुळं कित्येक व्यक्तींचा भाग्योदय होईल.

ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान अचानक धनप्राप्तीचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्साहजनक राहिल. स्त्रियांसाठी या वर्षाचा उत्तरार्ध दाम्पत्य जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येणारा ठरेल.

डिसेंबर महिन्यात दर शनिवारी मारुतीला चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून अर्पण करणं लाभदायी ठरेल. कौटुंबिक पातळीवर मंगल कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल.