Tandav Controversy : भाजप आमदार राम कदम म्हणाले – ‘सैफ अली खान आम्ही येतोय तुमच्या घरी, त्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील’

पोलिसनामा ऑनलाईन – भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी तांडव सीरिजला विरोध करत रामभक्त आणि शिवभक्तांना अ‍ॅक्टर सैफ अली खानच्या घराबाहेर एकत्र जमण्याचं आवाहन केलं आहे. कदम यांनी यासंदर्भात काही ट्विट्स केले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये राम कदम लिहितात की, सर्व देशवासी तसंच रामभक्त आणि शिवभक्त चलो चलो सैफ अली खानच्या घरी. सैफ अली खानजी तांडव वेब सीरिजची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर सीरिजमध्ये देवी देवता आणि हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद शब्द आणि दृश्यांबद्दल तुम्हाला समजलं होतं. तेव्हा तुम्ही मौन का धारण केलं. निर्मात्यांना अडवलं का नाही. सीरिजमधील अपमानास्पद दृश्य आणि संवाद याला तुमचंही समर्थन होतं का ? जर विरोध होताच तर मग समाजाला विभागणाऱ्या लोकांसोबत काम का केलं ?

आणखी एका ट्विटमध्ये कदम लहितात, सैफ अली खान तुम्ही देशाचे प्रतिभावान आणि आदरणीय कलाकार आहात. तु्म्ही भूतकाळात केलेली विधानं आम्हाला प्रश्न विचारायला मजबूर करत आहेत. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लगेच द्यावे लागतील. आता तुमच्या घरी येऊन हे प्रश्न विचारणं हा आमचा नाविलाज आहे. देशाला उत्तर द्या किंवा आमच्या स्वागतासाठी तयार व्हा.

सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांडव (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. यावरून वाद सुरू झाला आहे जो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली होती.