BJP National Executive | भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकरांवर मोठी जबाबदारी

दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या (BJP National Executive) नवी केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. यामध्ये नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा (Muslim Leader) समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे (BJP National Executive) प्रभारी अरुण सिंह (Party General Secretary Arun Singh) यांनी आज (शनिवार) सकाळी ही यादी जाहीर केली. यामध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, 13 राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नवीन कार्यकारिणी (BJP National Executive) जाहीर केली आहे. भाजपच्या या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे (Vinod Tawde), विजया राहटकर (Vijaya Rahtkar) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान देण्यात आलं आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विजया राहटकर आणि पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय संघठन महामंत्रिपदाची जबाबदारी बी.एल. संतोष (B.L. Santhosh) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय सह-संगठन महामंत्रिपदी शिवप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया राहटकर यांची निवड करण्यात आली आहे. अब्दुला कुट्टी (Abdulla Kutty), तारिक मन्सूर (Tariq Mansoor) हे 2 मुस्लीम चेहरे भाजपाने कार्यकारणीत पुढे आणले आहेत.

नुकतेच पंकजा मुंडे यांनी राजकारणापासून दोन महिने बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले होते.
त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय पातळीवरून पंकजा मुंडे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rain Update | पावसाचा जोर ओसरला! पुणे, सातारा, कोकणासह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज

Pune: DCP Vikrant Deshmukh ordered deportation of 65 Criminals in 7 months