Maharashtra Rain Update | पावसाचा जोर ओसरला! पुणे, सातारा, कोकणासह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | मागील तीन आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाने (Maharashtra Rain Update) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. शुक्रवारी दुपारपासून पावसाने गती कमी केली असल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार, आजही (शनिवार) राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग या जिल्ह्यांसह ठाणे आणि पालाघर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात ही यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भात (Vidarbha) आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Rain Update)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai Rain) उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार झालेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार कायम आहे.

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी

हिंगोली जिल्ह्यात (Hingoli Rain) अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 8 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पुराचे पाणी शेतात शिरले आहे. शेकडो एकर शेती या पाण्यामुळे खरडून गेली. सोयाबीनसह कापूस, हळद, ऊस, केळी या पिकांना फटका बसला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

Aurangabad Suicide News | धक्कादायक! दोन वर्षांच्या चिमुकलीसमोरच आई-वडिलाची गळफास घेत आत्महत्या

Terrorist Arrest In Pune | कोथरूडमधून अटक केलेल्या दहशतवाद्यांना पुण्यात आश्रय देणाऱ्यास आर्थिक पुरवठा करणाऱ्या रत्नागिरी येथील एकाला अटक

Pune Anesthesiologist Arrested as Leader of ISIS Maharashtra Module, Sent in NIA Custody Till August 8

NCP MLA Dhananjay Munde | शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडे म्हणाले-‘भाजपाचा आधार घेणं…’