तुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का ? जाणून घ्या कारणं

पोलिसनामा ऑनलाइन – सर्वांच्या हिरड्यांचा रंग हा गुलाबी किंवा लालसर असतो. किंवा तोंडाच्या आतील भागाचा रंग जसा असतो तसाच हिरड्यांचाही रंग असतो. परंतु काही लोकं अशीही असतात ज्यांच्या हिरड्यांचा रंग काळा असतो. तसं तर काळ्या हिरड्या असणं हा हिरड्यासंदर्भात एखाद्या समस्येचा संकेतही असू शकतो. म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर हिरड्यांचा रंग काळा असेल तर याची काय कारणं असू शकतात याची माहिती आज आपण घेणार आहोत.

काय आहेत हिरड्या काळ्या असण्याची कारणं ?

1) मेलानिन जास्त जमा होणं – जर तुमच्या त्वचेचा रंग काळा असेल तर तुमच्या हिरड्यांचा रंग गुलाबी न दिसता काळा दिसतो. कारण तुमच्या शरीरात मेलानिन हे तत्व जास्त असतं. मेलानिन शरीरात नैसर्गिकपणे तयार होतं. तसं तर काळ्या हिरड्या असणं ही काही समस्या नाही. परंतु जर हिरड्यांवर काळे डाग असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

2) काही औषधांचा वापर – काही औषधांच्या सेवनामुळं जर काही साईडइफेक्ट्स झाले असतील तर यामुळंही तुमच्या हिरड्या काळ्या दिसू शकतात. एका रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, काही खास डिप्रेशनची औषधं, मलेरियाची औषधं आणि अँटी बायोटीक्सच्या सेवनामुळं देखील हिरड्या काळ्या दिसू शकतात. जर तुम्ही असं काही औषध घेत असाल आणि यामुळं जर हिरड्या काळ्या झालेल्या दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांशी बोलायला हवं.

3) धूम्रपान – धूम्रापान केल्यानं कॅन्सर, फुप्फुसांची समस्या, श्वासांची समस्या, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक इत्यादींचा धोका वाढतो. धूम्रपान करणं हेही एका कारण हे ज्यामुळं हिरड्यांचा रंग काळा दिसू शकतो. जास्त प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना ओठ आणि हिरड्यांच्या काळेणाची समस्या उद्भवत असते. अनेकदा यामुळं हिरड्यांवर काळे डागही दिसू लागतात. असं असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे लक्षणं म्हणजे तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीचं लक्षणं असू शकतं.

4) जिंजिवायटीस – हा हिरड्यांचा एक आजार असतो. याला अल्सरेटीव जिंजीवायटीस असंही म्हणतात. हे एक प्रकारचं इंफेक्शन असतं. यामुळंही हिरड्यांमध्ये वेदना, ताप, आणि श्वासांच्या दुर्गंधाची समस्या होऊ शकते. हे इंफेक्शन झालं तर हिरड्यांचे टिशू मरतात. म्हणूनही हिरड्यांचा रंग काळा होऊ शकतो. जर तुम्हाला अशी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी बोलायला हवं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.