नितीन गडकरी यांच्या फार्म हाऊसवर बॉयलरचा स्फोट, एकाचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

नागपुरातील धापेवडा येथे असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फार्म हाऊस मधील बॉयलरचा विस्फोट होऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हि घटना काल मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पद्माकर श्रीराव (४५) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , नितीन गडकरी यांची पत्नी कांचन गडकरी यांच्या मालकीची कांचन इंडिया नामक सौंदर्य प्रसाधन करणारी कंपनी आहे. या कंपनीसाठी आवश्यक उत्पादनांची निर्मिती येथील फार्म हाऊसवर केली जाते. या फार्म हाऊसवर हळद गरम करण्यासाठी बॉयलर आहे. याठिकाणी बरेच मजूर काम करतात.

मंगळवारी संध्याकाळी अचानक या बॉयलर चा स्फोट झाला आणि त्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला . या घटनेत काही लोक जखमी झल्याचे देखील वृत्त आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी घटनास्थळी उपस्थित होत्या. यासंदर्भात कलमेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गडकरींच्या धापेवाडा येथील फार्महाऊसवर स्फोट झाला असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

नितीन गडकरी यांच्या फार्म हाउसवर बॉयलरचा स्पोट ,एकाचा मृत्यू