home page top 1

‘या’ कारणामुळं अनुष्का शर्माला मिळालं देशातील सर्वात शक्‍तिशाही 50 महिलांच्या यादीत स्थान

पोलीसनामा ऑनलाईन टीम : फॉर्च्युन इंडिया मासिकाने नुकतीच देशातील सर्वात शक्तिशाली ५० महिलांची यादी जाहीर केली आहे. सर्वात खास बाब म्हणजे या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मालाही स्थान देण्यात आले आहे. अनुष्का शर्मा आघाडीची अभिनेत्री सोबत सोबत सिनेनिर्माती देखील आहे. फॉर्चूनच्या यादीमध्ये अनुष्का शर्मा ३९ व्या क्रमांकावर आहे.

याबाबत स्पष्टीकर देताना फॉर्च्युन इंडियाने आपल्या संकेतस्थळावर लिहिले की, अनुष्का शर्मा कपड्यांची कंपनी नुशचा चेहरा असून निवा, एले १७, मिंत्रा आणि लावी अशा बर्‍याच ब्रँडबरोबर काम करत आहे. यासह, ती एक यशस्वी फिल्म प्रोड्युसर देखील आहे.

यामध्ये पुढे म्हटले आहे की, अनुष्का शर्मा यांनी वयाच्या २५ व्या वर्षी क्लीन स्लेट फिल्मची स्थापना केली. याशिवाय त्यांनी कमी बजेटचे तीन चित्रपटही तयार केले होते. त्यामध्ये एनएच १०, फिल्लौरी आणि परी यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर ४० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. यासह, अनुष्का शर्मा अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसाठी एक वेब सीरिज तयार करीत आहे.

२०१८ मध्ये अनुष्का शर्माने बॉलिवूडमध्ये १० वर्षे पूर्ण केली. यापूर्वी अनुष्का शर्मा झिरो या चित्रपटात दिसली होती. येथे तिने शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली. अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याशिवाय अनुष्का शर्माने आमिर खानसोबत पीके या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही सुपरहिट ठरला.

Visit :- policenama.com

 

Loading...
You might also like