Bollywood Celebs First Job | बॉलिवूडमधील कलाकारांनी स्टार बनण्याअगोदर केलंय ‘हे’ काम; ‘या’ हॉट अभिनेत्रीने तर केले रिपोर्टरचे काम

पोलीसनामा ऑनलाइन : Bollywood Celebs First Job | आज आपण बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना पाहतो मात्र हे कलाकार बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्या आधी विविध क्षेत्रात काम करत होते. तर आज आपण अशाच बॉलीवूड कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी याआधी कोणत्या पदावर काम केले आहे. (Bollywood Celebs First Job)

बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तो बँकॉक स्थित एका रेस्टॉरंटमध्ये शेफ आणि वेटरचे काम करत होता. त्याचबरोबर तो ब्लॅक बेल्ट देखील आहे. त्यांनी बँकॉक मध्ये मार्शल आर्टचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तो मार्शल आर्ट्सचा शिक्षक होण्यासाठी परत भारतात परतला आणि अभिनयाकडे वळाला.

आपल्या ग्लॅमरस लुक ने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री कियारा ही बॉलीवूडमध्ये येण्याआधी एक शिक्षक म्हणून काम करत होती.

या यादीत रणवीर सिंहचाही समावेश आहे. रणवीर सिंह बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी तो कॉपीरायटर म्हणून काम करायचा. त्यांनी ओगिल्वी आणि माथर आणि जे. वॉल्टर थॉम्पसन यासारख्या जाहिराती कंपनीमध्ये काम केले होते.

तर अभिनेत्री परिणीती चोप्राला अभिनय क्षेत्रामध्ये कोणतेच रस नव्हते. तिला लंडनमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर बनायचे होते. एवढेच नाही तर परिणीती मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस फायनान्स आणि इकॉनॉमिक्स मध्ये तिहेरी पदवीधर आहे. विदेशात नोकऱ्या मिळत नसल्यामुळे ती मायदेशी परत आली आणि यशराज फिल्म्स मध्ये त्यांच्या मार्केटिंग आणि जनसंपर्क टीम मध्ये इंटर्न म्हणून काम करू लागली होती.

अभिनेता अमिताभ बच्चनला देखील अभिनयव्यतिरिक्त दूरदर्शन मध्ये रेडिओ जॉकी व्हायचे होते.
मात्र वाहिनीला त्यांचा आवाज आवडला नसल्याने त्यांनी अमिताभला नकार दिला.
यानंतर त्यांनी एका शिपिंग फॉर्ममध्ये एक्झिक्युटीव्ह म्हणून काम केले.
एवढेच नाही तर त्यांनी बर्थ अँड कंपनी नावाच्या शिपिंग कंपनीसाठी फ्लॅट ब्रोकर म्हणून देखील काम केले आहे.

सर्वांना हे ऐकून आश्चर्यच वाटेल की अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती श्रीलंका
मध्ये एक टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती.

तर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी दोन वर्ष वॉचमनचे काम केले.
त्याचबरोबर त्यांनी केमिस्टची देखील नोकरी केली आणि त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश
घेतला.

काही वर्ष कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनय क्षेत्राकडे वळाली.
‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.
तर भूमी ही कास्टिंग डायरेक्टर सानू शर्माची सहाय्यक होती.

Web Title :- Bollywood Celebs First Job | akshay kumar kiara advani amitabh bachchan bollywood celebs first job before debuting in film

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amruta Subhash | अमृता सुभाषने बॉलिवूडमधील टाइपकास्ट वर केलेले ‘ते’ वक्त्यव्य चर्चेत; “ओटीटीमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या…”

Aurangabad Crime | पत्नीच्या गर्भपातासाठी पतीचे धक्कादायक कृत्य; फुलंब्री मधील प्रकार

Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात; वडील भगवान गोरे यांच्या विधानाने खळबळ