Dadasaheb Phalke Awards 2021 : अक्षय कुमारला ’लक्ष्मी’साठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टरचा किताब, सुशांतचे फॅन्ससुद्धा झाले समाधानी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन दिवसांपासून ’दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड 2021 ची चर्चा सुरू आहे. मागील शनिवारी रात्री अनेक कॅटगरीत या अवॉर्डची घोषणा करण्यात आली होती. या अवॉर्ड सोहळ्याची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल होत आहेत. या अवॉर्ड सोहळ्यात अजय देवगन स्टारर ’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ ला बेस्ट फिल्मचे अवॉर्ड देण्यात आले. तर ’लक्ष्मी’ चित्रपटासाठी अक्षय कुमारला बेस्ट अ‍ॅक्टरचा किताब मिळाला. ’छपाक’ चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार दीपिका पदुकोणला मिळाला.

या दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फॅन्ससुद्धा समाधानी झाले. सुशांतला मरणोत्तर दिल बेचारा चित्रपटासाठी क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्टरचे अवॉर्ड देण्यात आले. क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचे अवॉर्ड कियारा आडवाणीने पटकावले. तिला ’गिल्टी’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. राधिका मदानला ’अंग्रेजी मीडियम’ चिपटातील सपोर्टिंग रोलसाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा किताब मिळाला. कॉमिक रोलसाठी कुणाल खेमूला ’लूटकेस’ चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टराचा पुरस्कार मिळाला.

’ब्लैक फ्राइडे’ (2004), ’सरकार राज’ (2008), ’गुलाल’ (2009), ’एबीसीडी’(2013) आणि ’द गाजी अटैक’ (2017) सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता के. के. मेनन यांस मोस्ट वर्सटाइल अ‍ॅक्टर किताबाने सन्मानित करण्यात आले.

मागील कही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादा साहब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डच्या टीमला शुभेच्छा पाठवल्या होत्या. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले होते, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड- 2021 बाबत समजल्याने मी आनंदी आहे. हे अवॉर्ड दादासाहेब फाळके यांच्या वारशाचा जल्लोष आहे, जे खरे दूरदर्शी होते. ज्यांची इंडियन सिनेमाच्या शानदार प्रवासात मुख्य आणि अक्षय भूमिका आहे.

सदाबहार अभिनेता धर्मेंद्र यांना चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी ’आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्यूशन इन फिल्म इंडस्ट्री’ने सन्मानित करण्यात आले. डब्बू रत्नानी यांना ’फोटोग्राफर ऑफ दि ईयर’ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार भारतीय फिल्म उद्योगाचे ’पितामह’ म्हणून ओळखले जाणारे महान व्यक्तीमत्व दादासाहेब फाळकेच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला होता. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 मध्ये झाला होता. त्यांनी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून प्रशिक्षण घेतले होते.