‘दिल्ली क्राईम’नं जिंकला ‘इंटरनॅशनल एमी अवॉर्ड’ ! आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेली पहिली इंडियन सीरिज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली क्राईम (Delhi Crime) या वेब सीरिजला ड्रामा कॅटेगरीत इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स (International Emmy Awards 2020) नं सन्मानित करण्यात आलं आहे. एका इंडियन सीरिजसाठी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा विजय आहे.

कोरोना व्हायरसमुळं 48 वर्षांत पहिल्यांदाच इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2020 हा व्हर्युअली होस्ट करण्यात आला. रिचर्ड काईंडनं हा व्हर्युअल इव्हेंट होस्ट केला होता. नेटफ्लिक्स सीरिज दिल्ली क्राईम पहिली सीरिज बनली आहे, जिनं एमी अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 2012 साली दिल्लीत झालेल्या गँगरेपवर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजला बेस्ट ड्रामा सीरिज अवॉर्ड मिळाला आहे.

या सीरिजमध्ये शेफाली शाह सोबत राजेश तेलंग, आदित्य हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोडा, सिद्धार्थ भारद्वाज असे अनेक कलाकार दिसले होते. शेफाली शाहनं या सीरिजमध्ये डेप्युटी कमिश्नर वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली होती. रिची मेहता डायरेक्टेड ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.

ही आहे विनर लिस्ट –
1) बेस्ट ड्रामा सीरिज – Delhi Crime

2) बेस्ट कॉमेडी सीरिज – Ninguem Ta Olhando

3) बेस्ट अ‍ॅक्ट्रेस – Glenda Jackson (Elizabeth is Missing)

4) बेस्ट अ‍ॅक्टर – Billy Barratt (Responsible Child)

5) बेस्ट टीव्ही मुव्ही – Responsible Child

6) बेस्ट शॉर्ट फॉर्म सीरिज – Martyisdead

7) बेस्ट डॉक्युमेंट्री – For sama

8) बेस्ट आर्ट्स प्रोग्रामिंग – Vertige De La Chute (Ressaca)