Sooryavanshi पासून Maidaan पर्यंत, आता चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार ‘हे’ 15 मोठे सिनेमे, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारने सिनेमा हॉलला 100 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर चित्रपटसृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे. थिएटरचे मालक प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी तयार आहेत. यावर्षी अनेक मोठे चित्रपट त्यांच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये कोरोना साथीच्या आजारामुळे मागील वर्षी प्रदर्शित न झालेल्या चित्रपटांचा देखील समावेश आहे.

सूर्यवंशी : रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल.

83 : हा चित्रपट 1983 च्या क्रिकेट वर्ड कपच्या विजयावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देवची भूमिका साकारली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट यंदाच्या पहिल्या तिमाहीतही प्रदर्शित होणार आहे.

बेट बॉटम : हा चित्रपट साथीच्या वेळीच बनला होता. अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम चित्रपटात हुमा कुरेशी, वाणी कपूर आणि लारा दत्तादेखील काम करत आहेत. हा चित्रपट 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई : सलमान खानचा हा चित्रपट ईदवर रिलीज होणार आहे. यात दिशा पटानी आणि रणदीप हूडा देखील महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. दरम्यान थिएटर मालक आणि वितरकांनी सलमानला ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज करण्यासाठी राजी केले.

सत्यमेव जयते 2 : ईदवर सलमान खानचा ‘राधे’ जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटासह साकारला जाईल. हा चित्रपट 14 मे रोजी थिएटरवर प्रदर्शित होईल.

ब्लॅक विडो : मार्वल सुपरहीरो सीरिजचा चित्रपट ‘ब्लॅक विडो ‘ 7 मे रोजी अमेरिकेत प्रदर्शित होईल आणि त्यानंतरच तो भारतातही प्रदर्शित होऊ शकेल.

शर्माजी नामकीन : मागील वर्षी या चित्रपटात दिवंगत अभिनेता ऋषी कपूर काम करत होते. ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची भूमिका परेश रावल यांनी साकारली आहे. ऋषी कपुर यांच्या वाढदिवशी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी ‘शर्माजी नामकीन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

धाकड : सध्या कंगना रनौत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गांधी जयंतीनिमित्त म्हणजेच एक ऑक्टोबरला ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे.

नो टाईम टू डाय : बॉन्ड सीरिजचा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत. अभिनेता डॅनियल क्रेग शेवटच्या वेळी एजंट 007 मध्ये दिसला आहे.

याशिवाय एसएस राजामौलीचा ‘आरआरआर’ ( RRR) चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. अजय देवगणचा स्पोर्ट्स बायोपिक ‘मैदान’ त्याच वेळी 15 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. यंदाच्या दिवाळीला शाहिद कपूरचा ‘जर्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच, तापसी पन्नूने आपल्या ‘रश्मी रॉकेट’ या स्पोर्ट्स चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. जरी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु यावर्षी रिलीज होण्याची अपेक्षा आहे. रणवीरने काही महिन्यांपूर्वी आपल्या ‘जयेशभाई जोरदार ‘ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट यंदा रिलीज होऊ शकतो. ख्रिसमसच्या दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंह चड्डा’ हा चित्रपट रिलीज होऊ शकतो.