Birthday SPL : बिकिनी घालणारी पहिली भारतीय अ‍ॅक्ट्रेस होती शर्मिला टागोर ! मॅगेझिनवरील Bold फोटोमुळं उडाली होती ‘खळबळ’ (फोटो)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील सुंदर अ‍ॅक्ट्रेस शर्मिला टागोर (Sharmila Tagore) तिच्या जमान्यातील हिट अँड बोल्ड अ‍ॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. शर्मिलानं आपल्या काळात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शर्मिलानं काश्मीरची कलीपासून तर बिकिनी लुकपर्यंत अनेकदा अटेंशन घेतलं आहे आणि चर्चेत आली आहे. जेव्हा तिनं पहिल्यांदा पडद्यावर स्विमसूट घातला होता तेव्हा ती जोरदार चर्चेत आली होती. आज शर्मिलाचा वाढदिवस आहे. शर्मिलाचा जन्म 8 डिसेंबर 1944 रोजी कानपूरमध्ये झाला होता. आज ती आपला 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज आपण काही इंटरेस्टिंग किस्से जाणून घेणार आहोत.

शर्मिला टागोर बिकिनी घालणारी पहिली अ‍ॅक्ट्रेस होती. मॅगेझिनमध्ये छापून आलेल्या त्यांच्या बोल्ड फोटोनंही खूप खळबळ उडवली होती. 1967 साली रिलीज झालेल्या अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस (An Evening in Paris) सिनेमात शर्मिलानं स्विम सूट घातला होता. असं करणारी ती पहिली भारतीय अ‍ॅक्ट्रेस होती. फिल्मफेअर मॅगेझिनच्या ऑगस्ट 1966 मधील अंकासाठी तिनं टू पीस बिकिनी घातली होती. याचीही जोरदार चर्चा झाली होती.

अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस सिनेमादरम्यान शर्मिला आणि मंसूर अली खान (Mansoor Ali Khan Pataudi) रिलेशनशिपमध्ये होते. याचवेळी जेव्हा मंसूर यांची आई शर्मिलाला भेटायला आली होती, तेव्हा ठिकठिकाणी शर्मिलाचे स्विम सूटमधील पोस्टर्स लागले होते.