Neha Kakkar Is On Top In Forbes list : नेहा कक्करची ‘बिग बी’ अमिताभ अन् ‘किंग’ खानला दिली ‘टक्कर’ ! फोर्ब्सच्या यादीत Top वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंडियन आयडल (Indian Idol) ची जज फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) हिनं अवघ्या 32 व्या वर्षी अनेक किताब नावावर केले आहेत. ती इंडस्ट्रीतील यशस्वी सिंगरपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच तिला टॉप हिंदी आणि पंजाबी फीमेल आर्टीस्ट 2020 चा किताब मिळाला होता. आता नेहानं आणखी एका यादीत समाविष्ट झाली आहे. खास बात अशी की, ती बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या बरोबरीनंच उभी आहे.

नेहाचं नाव फोर्ब्सच्या यादीत त्या 100 सेलेब्सच्या लिस्टमध्ये समाविष्ट झालं आहे जे सोशल मीडियावर जास्त सक्रिय असतात आणि त्यांनी सोशलवरून लोकांवर खूप प्रभाव टाकला आहे. आशिया-पॅसिफिक मधील टॉप मोस्ट सेलेब्सच्य या यादीत नेहा कक्कर हिचंही नाव आहे. सिंगरनं तिच्या इंस्टावरून याबाबत माहिती दिली आहे. तिनं यासाठी आनंदही व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब अशी की, यात फक्त 12 भारतीयांच्या नावाचा समावेश आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती फोर्ब्सच्या कव्हर फोटोवर दिसत आहे. यावर लिहिलंय की, केवळ 12 भारतीय. सिंगरनं हा फोटो शेअर करत लिहिलं की, गर्व, गर्व गर्व स्वत:वर खूप गर्व वाटत आहे. तु्म्हाला माहित असेल मित्रांनो या यादीत अमिताभ बच्चन सर आणि शाहरुख सर यांच्या सोबत माझंही नाव आहे. सर्वांचे आभार. देवाचे आभार.