प्रॉपर्टीवरून भिडली डायरेक्टर शेखर कपूरची Ex वाईफ, दाखल केली केस

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध फिल्म मेकर शेखर कपूर आणि त्यांची एक्स वाईफ सुचित्रा कृष्णमूर्ती यांनी 2006 साली घटस्फोट घेतला होता. परंतु यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद थांबत नाही असं दिसतंय. आता तर यात कबीर बेदीचंही नाव आलं आहे.

शेखर कपूर यांची एक्स वाईफ सुचित्रा कृष्णमूर्तीनं प्रॉपर्टीच्या वादाप्रकरणी केस दाखल केली आहे. एका वेबासाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात एका फॅमिली कोर्टात सुचित्रा रडताना दिसली होती. तिनं असाही दावा केला आहे की या प्रॉपर्टीवर कबीर बेदीनं कब्जा केला आहे.

रिपोर्टनुसार, सुचित्रा म्हणाली की, ही प्रॉपर्टी तिची मुलगी कावेरीची आहे. ही प्रॉपर्टी कबीर बेदी वापरत आहे. अशात आता तिच्याकडे केस दाखल करण्याव्यतिरीक्त कोणताही मार्ग नाही. कबीर बेदी ज्या फ्लॅटमध्ये रहात आहे त्यावरून वाद सुरू आहे. जे घरात आधीच रहात आहेत त्यांना शेखर कपूर यांचाही सपोर्ट आहे.”

काही वर्षांपूर्वीही सुचित्रानं यावर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत बोलताना ती म्हणाली होती की, “कबीर बेदी आणि त्याची बायको फ्लॅटमधून बाहेर निघत नाहीत. माहिती नाही त्यांनी शेखरवर काय जादू केली आहे.”

कबीर बेदीनंही यावर स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानं म्हटलं होतं की, तो त्या ठिकाणी भाड्यानं राहत आहे. याबाबत कायदेशीर करार झाल्याचे कागदपत्रही त्याच्याकडे आहेत.

हे प्रकरण तीन वर्षांपासून आजही सुरू आहे. सुचित्रा आणि शेखर यांनी 1997 मध्ये लग्न केलं होतं. 2006 साली दोघं वेगळे झाले.