SSR Case : सारा अली खानकडून रिया चक्रावर्तीनं घेतलं होतं अनेकदा ड्रग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स अँगलच्या चौकशीसंदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्याचवेळी रिया चक्रवर्तीच्या संपर्कात असणाऱ्या पॅडलर्सनाही अटक केली आहे. आता सारा अली खानच्या संपर्कात असणाऱ्या पेडलर्सना अटक करण्याची वेळ आली आहे.

रिया सारा अली खान कडून घेत होती ड्रग्ज
रिया चक्रवर्तीशी संबंधित बहुतेक ड्रग पेडलर्सना एनसीबीने पकडले आहे. रिया आणि सारा काही ड्रग पेडलर्सशी संपर्कात होत्या, परंतु मोठा खुलासा म्हणजे रियाने सारा कडून बऱ्याच वेळा ड्रग्ज घेतलं आहे. रियाशिवाय साराचे स्वत:चे ड्रग पेडलर आहेत, ज्यापासून सारा स्वतंत्रपणे ड्रग्ज घेत होती. या कारणास्तव, साराने रियाला तिच्या वैयक्तिक ड्रग्स पॅडलर्स कडून ड्रग घेऊन दिलं होतं, तेच ड्रग रियाने सुशांतला आणून दिलं होतं.

साराच्या ड्रग पेडलर्सचा शोध
रिया आणि सारा यांना ड्रग देणाऱ्या मोठ्या ड्रग्स पॅडलर्सचा शोध एनसीबीची टीम घेत आहे. रियाच्या संपर्कातील अनेक ड्रग पेडलर्सना अटक झाली असून आता सारा अली खानच्या संपर्कातील ड्रग पेडलर्सना अटक करण्याची वेळ आली आहे.

आरोपींना विशेष न्यायालयात हजर केले जाणार
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या आरोपींना मुंबईतील एनसीबी विशेष न्यायालयात हजर केले जाईल. मुंबई येथून 5 आणि गोव्यातून एका ड्रग पेडलर्सना अटक करण्यात आली आहे, ज्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामध्ये करमजित, ड्वेन फर्नांडिस, अंकुश अरेन्झा या ड्रग्ज पॅडलर्सचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like