JNU वादावर अजय देवगणची महत्वाची ‘प्रतिक्रिया’, विचार केला तर निघेल ‘तोडगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजय देवगनचा तानाजी – द अनसंग वॉरिअर आज शुक्रवारी प्रदर्शित झाला. या दरम्यान चर्चा होती ती जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्लाची. आता अजय देवगणने सोशल मिडियार आपले मत मांडले आहे. अजयने जो मुद्दा उचलला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे.

अजयने ट्विट करत लिहिले की, मी कायम सांगितले आहे की आपण सत्य समोर येईपर्यंत वाट पाहायला हवी. मी प्रत्येकाला आवाहन करतो की आपल्याला शांती आणि बंधुभावाची भावना वाढवली पाहिजे. अजय याआधी देखील जेएनयूवर बोलला आहे. अजयची ही भूमिका अनेकांना पटल्याने त्याचे त्याच्या चाहत्यांनी कौतुक केले आहे.  

अजय पहिल्यांदा देखील मुलाखतीत याबद्दल बोलला आहे. जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या हिंसेमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी यासंबंधित ट्विट केले आहे. दीपिका पादुकोण देखील छपाक सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी दिल्लीत जेएनयूमध्ये आली होती. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यामुळे ती ट्रोल देखील झाली. परंतु दीपिकाने या भेटीवेळी कोणतेही विधान केले नाही.

अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमाचा विचार केला तर हा सिनेमा 3800 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. आता या सिनेमाची स्पर्धा दीपिकाच्या छपाक सिनेमाशी आहे. छपाक फक्त 1700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाली आहे. तान्हाजीच्या तुलनेत हा छोटा सिनेमा आहे. तान्हाजी या सिनेमाची कथा इतिहासावर आधारित आहे. तर छपाकची कथा आजच्या कथेवर अवलंबून आहे. ही कथा अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालची आहे. 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/