Upcoming Bollywood & Hollywood Movies in May : राधे, तूफान, वंडर वुमन 1984… OTT प्लॅटफॉर्मवर येत आहेत इतके चित्रपट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या घातक लाटेने मनोरंजन इंडस्ट्रीचे सर्व प्लॅनिंग बिघडवून टाकले आहे आणि थिएटर रिलिजचे पूर्ण कॅलेंडर विस्कटले आहे. सिनेमागृहात चित्रपटांचे रिलिज जरी रखडले असले तरी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे. मे मध्ये अनेक मोठे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर येतील. त्यांची पूर्ण लिस्ट जाणून घेवूयात…

हम भी अकेले तुम भी अकेले
9 मे रोजी डिज्नी+ हॉटस्टारवर हम भी अकेले तुम भी अकेले येत आहे. हरीश व्यास दिग्दर्शित या चित्रपटात अंशुमान झा आणि झरीन खान मुख्य भूमिकेत आहेत. ही एक होमोसेक्सुअल मुलगा आणि लेस्बियन मुलीच्या दिल्ली ते हिमाचल प्रदेश रोड ट्रिपवर आधारित आहे. या प्रवासात दोघे रिलेशनशिप एक्सप्लोअर करतात.

राधे
पॅन्डेमिकच्या कारणामुळे सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट राधे काही निवडक सिनेमागृहांसह जीप्लेक्सवर 13 मे रोजी रिलिज होईल. मात्र, झीप्लेक्स आणि झी5 वर चित्रपट पाहण्यासाठी एक ठराविक रक्कम खर्च करावी लागेल, कारण या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट व्ह्यूच्या आधारावर रिलिज होत आहेत. याशिवाय अनेक डीटीएच प्लॅटफॉर्मवर सुद्धा राधे येईल.

सिनेमा बंदी
14 मे रोजी निर्माता-दिग्दर्शक राज अँड डीकेचा चित्रपट सिनेमा बंदी नेटफ्लिक्सवर येईल. मात्र, हा इंडी चित्रपट आहे, ज्याची निर्मिती राज अँड डीकेच्या बॅनरने डी2आर इंडीने केली आहे.

वंडर वुमन 1984
अमेझॉनवर 15 मे रोजी हॉलीवुड चित्रपट वंडर वुमन 1984 रिलिज होईल. गेल गॅडट अभिनीत चित्रपट मागच्या वर्षी भारतात सुद्धा सिनेमागृहात रिलिज झाला आहे. परंतु, आता चाहते तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील.

सरदार का ग्रँडसन
नेटफ्लिक्सवर 18 मे रोजी बॉलीवुड चित्रपट सरदार का ग्रँडसन रिलिज होणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि रकुलप्रीत लीड रोल्समध्ये आहेत. नीना गुप्ता, जॉन अब्राहम आणि आदिती राव हैदरी सुद्धा महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. हा फॅमिली कॉमेडी ड्रामा आहे.

तूफान
21 मे रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर फरहान अख्तरचा चित्रपट तूफान रिलिज होईल. हा चित्रपट अगोदर थिएटरमध्ये येणार होतो, पण थिएटर बंद असल्याने थेट ओटीटीवर येत आहे.

आर्मी ऑफ द डेड
21 मे रोजी नेटफ्लिक्सवर आर्मी ऑफ द डेड रिलिज होईल. आर्मी ऑफ द डेड झॉम्बी हायस्ट चित्रपट आहे, ज्यामध्ये डेव बटिस्टा, एला परनेल, ओमरी हार्डविक सारखे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. यात हुमा कुरेशी बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे.