पदवीधरांसाठी महाराष्ट्रात ‘सरकारी’ नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 46000 पगार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुंबई उच्च न्यायालयाने ‘सिनियर सिस्टिम ऑफिसर’ पदांसाठी भरती सुरु केली आहे. याअंतर्गत 165 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार bombayhighcourt.nic.in या वेबसाइवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर असणार आहे.

या पदांसाठी भरती –
सीनियर सिस्टम ऑफिसर – 38
सिस्टम ऑफिसर – 127
एकूण पद – 165

शैक्षणिक पात्रता –
– उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून कंप्यूटर सायन्स, इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेली असावी.
– उमेदवाराने कंप्यूटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये मास्टर डिग्री केलेली असावी, याबरोबरच 5 वर्षांचा अनुभव असावा.

वेतनमान –
सिनियर सिस्टम ऑफिसर – 46,000 रुपये
सिस्टम ऑफिसर – 40,000 रुपये

असा करा अर्ज –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी bombayhighcourt.nic.in या वेबसाइटवर भेट द्यावी.
2. होमपेजवर Recruitment टॅब असेल.
3. तेथे Senior System Officer and System Officer वर एंटर करा.
4. तुमच्या डिस्प्लेवर एक PDF प्रकाशित होईल.
5. खाली स्क्रोल करुन अर्जासाठीच्या लिंकवर क्लिक करावे.
6. त्यात संपूर्ण माहिती देऊन नाव आणि रोल नंबर एंटर करावा.
7. तुमचा अ‍ॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्लेवर प्रकाशित होईल. त्यावरील माहिती वाचून योग्य ती कागदपत्र अपलोड करा.
8. तुमचा अर्ज डाऊनलोड करा आणि त्यांची कॉपी तुमच्याकडे ठेवा ज्याचा पुढे वापर होईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –
उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर असेल.

Visit : Policenama.com