मुंबई उच्च न्यायालय भरती 2021 : स्टेनोग्राफरच्या पदे रिक्त, 132300 पर्यंत मिळेल पगार

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 20 फेब्रुवारी : मुंबई उच्च न्यायालयाने स्टेनोग्राफर पदांची भरती काढली आहे. या रिक्त पदांची भरतीलवकरच करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत उच्च श्रेणी आणि स्टेनोग्राफर निम्न श्रेणीच्या पदांवर स्टेनोग्राफर नियुक्त केले जाणार आहेत. इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट bhc.mahaonline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

जाणून घ्या, पदासाठीची शैक्षणिक पात्रता :
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफरची नोकरी मिळविण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा. याशिवाय कामाचा अनुभवही आवश्यक आहे.

वय, श्रेणी :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 38 वर्षे असावे.

लक्षात ठेवा महत्त्वाच्या तारखा :
अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची तारीख: 18 फेब्रुवारी 2021
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ः 05 मार्च 2021

जाणून घ्या, पगाराची माहिती :
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) – 41800 – 132300 रुपये दरमहा
स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) – 38600 – 122800 दरमहा

अशी आहे निवड प्रक्रिया :
अधिकृत अधिसूचनेनुसार या पदांसाठी उमेदवारांची निवड टायपिंग वेग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

असा करा अर्ज :
इच्छुक आणि पात्र उमेदवार 05 मार्च 2021 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या स्टेनोग्राफरच्या पदासाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी, आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.