Boney Kapoor | बोनी कपूरने साधला अक्षय कुमारवर निशाणा! म्हणाले ’25-30 दिवसात चित्रपट करणारे…’

पोलीसनामा ऑनलाईन : Boney Kapoor | अक्षय कुमार (Akshya Kumar) हा नेहमी त्याच्या हिट चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अक्षय कुमारचे ॲक्शन चित्रपट चाहत्यांना फारच आवडतात. पण यंदाच्या वर्षी मात्र अक्षय कुमारचे एका मागोमाग एक फ्लॉप चित्रपट पाहायला मिळाले. एका वर्षात अक्षय कुमार जवळपास चार ते पाच चित्रपट सहज शूट करतो. अक्षयला एका चित्रपटासाठी वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागतो. आता चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी अक्षयचा नाव न घेताच त्याच्यावर निशाणा साधला आहे.

सध्या बोनी कपूर आपली मुलगी जान्हवीच्या (Janhvi Kapoor) ‘मिली’ (Mili) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमात दिसत आहे. अलीकडे त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये जान्हवी सोबत आल्याचे दिसले. यावेळी त्यांनी करिअर, बॉलीवूड (Bollywood) आणि इंडस्ट्रीशी संबंधित अनेक स्टार्स बद्दल मोठे खुलासे केले. यावेळी ते बोलले की, “इंडस्ट्री मध्ये देखील असे काही नामवंत कलाकार आहेत जे फक्त 25 ते 30 दिवसात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करतात आणि संपूर्ण पैसे मिळवतात.
मात्र यांना हे नाही कळत की चित्रपट चांगले बनवण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो”.
सध्या बोनी कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी जरी नाव घेतले नसले तरी त्याच्या या व्हिडिओवरून नेटकऱ्यांना बोनी कापूर
हे अक्षय कुमारला टारगेट करत असल्याचे सहजासहजी कळाले. कारण अक्षय कुमारने कपिल शर्माच्या
शोमध्ये कित्येकदा हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सांगितले होते की तो 25 ते 30 दिवसात चित्रपट पूर्ण करतो.

Web Title :-  Boney Kapoor | did boney kapoor take dig on akshay kumar for this reason in the kapil sharma show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिंदे गटातील खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘महाविकास आघाडीचे लोक रात्री-बेरात्री मुख्यमंत्र्यांना…’

Jitendra Awhad | ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची नोटीस