आता ‘जान्हवी’ला टक्कर देणार भाऊ अर्जुन कपूर, ‘मुंबई सागा’ सोबत ‘संदीप और पिंकी फरार’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा फटका चित्रपट क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला. दरम्यान आता प्रथमच बॉक्स ऑफिसवर तीन मोठे चित्रपट पाहायला मिळणार आहेत आणि त्यासोबत एक रंजक टक्करही पाहायला मिळणार आहे. जान्हवी कपूर भाऊ अर्जुन कपूरसोबत पहिल्यांदाच बॉक्स ऑफिसवर टक्कर पहायला मिळणार आहे. शुक्रवारी अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राचा चित्रपट संदीप आणि पिंकी फरार आणि जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’ रिलीज झाला.

रुही या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने चित्रपटगृहात आठ दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. यावेळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगानंतर, रुहीचे कलेक्शन परिस्थितीनुसार समाधानकारक मानले जाते. या चित्रपटाने सात दिवसांत 16 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केले आहेत. मात्र, आजपासून (19 मार्च) रुहीचा रस्ता थोडा अवघड होईल.

संदीप और पिंकी फरार हा यश राज फिल्म्सचा चित्रपट आहे, जो दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित आहे. यात इश्कजादे आणि नमस्ते इंग्लंड नंतर अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. संदीप और पिंकी फरार हा एक डार्क कॉमेडी जॉनर चित्रपट आहे. चित्रपटाच्या थिएटर रिलीझची घोषणा केल्यानंतर यशराज बॅनरने या चित्रपटाचे प्रमोशन मुख्यत: सोशल मीडियावरून केले आहे.

रुहीच्या समोरचा दुसरा चित्रपट म्हणजे मुंबई सागा. संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्टच्या भूमिकेत इमरानसह जॉन गँगस्टरच्या भुमिकेत दिसणार आहे. हा क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. या जॉनरचे चित्रपट यापूर्वीवीह प्रेक्षकांनी पाहिले आहेत. हा मसालेदार मनोरंजन करणारा चित्रपट आहे.

रुहीला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर चित्रपटसृष्टीला दिलासा मिळाला की, मोठ्या ब्रेक नंतर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये पोहोचले आहेत. आता नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनास प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो, याविषयी आता सर्वांनाच उत्सुकता आहे.