Brain Stroke | ‘या’ 7 वाईट सवयींमुळे तरूणांमध्ये वाढत आहे ब्रेन स्ट्रोकचा धोका, एक्सपर्टने सांगितले बचावाचे उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या तरूणांमध्ये Brain Stroke चा धोका खुप वाढला आहे. अखेर तरूणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका का वाढत आहे, याबाबत जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेणे खुप महत्वाचे आहे की, अखेर Brain Stroke काय आहे? ब्रेन स्ट्रोकबाबत फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टीट्यूट, गुरूग्राम (Fortis Memorial Research Institute, Gurugram) च्या न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे डायरेक्टर आणि प्रमुख डॉ. प्रवीण गुप्ता यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीमधील माहिती येथे जाणून घेवूयात… due to these dirty habits the risk of brain stroke is increasing among the youth symptoms of brain stroke

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय?

Brain Stroke च्या प्रकरणात मेंदूच्या आर्टरी (नस) मध्ये क्लॉट (गाठ) अडकतो आणि मेंदूत रक्तप्रवाह थांबतो. या कारणामुळे मेंदूचा एक भाग काम करणे बंद करतो.

ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार

1. पहिला स्ट्रोक मेंदूच्या नसांमध्ये ब्लॉकेजमुळे होतो, ज्यास सामान्य भाषेत क्लॉट म्हटले जाते.

2. तर दुसरा स्ट्रोक मेंदूची नस फाटल्याने होणार्‍या रक्ताच्या लीकेजमुळे होतो ज्यास हॅमरेज म्हटले जाते.

ही आहेत Brain Stroke ची प्रमुख लक्षणे

1 जीभ घसरणे किंवा बोबडेबोल येणे

2 हाता-पायात कमजोरी

3 चेहर्‍याची एक बाजू लटकणे

4 बेशुद्ध होणे

5 स्मरणशक्ती जाणे

हे लक्षात ठेवा

ब्रेन स्ट्रोकशी संबंधीत कोणतेही लक्षण आढळले तर आपल्या मनाने कोणतेही औषध खाऊ नका. अशावेळी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा. ब्रेन स्ट्रोक अचानक होतो. मेंदूतील रक्तप्रवाह थांबण्यास केवळ 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागतो. रक्ताचा प्रवाह थांबल्यानंतर केवळ 5 मिनिटात मेंदू काम करणे बंद करतो आणि याच्या 10-15 मिनिटानंतर मेंदू गंभीर प्रकारे खराब होऊ लागतो.

तरूणांमध्ये ब्रेन स्ट्रोक चा धोका वाढण्याची कारणे

1 अनियंत्रित लाईफस्टाईल

2 तंबाखू, दारू आणि कॉफीचे व्यसन

3 विविध कारणामुळे सतत तणावात राहणे

4 झोपणे-उठणे, खाणे-पिणे याची निश्चित वेळ नसणे

5 व्यायाम न करणे

6 लठ्ठपणा, ब्लड प्रेशर, डायबिटीज, प्रदूषण

7 वरील स्थितीत कॉलेस्ट्रॉलची लेव्हल वाढते आणि अँटी-ऑक्सीडेंट्स कमी होते. याच करणामुळे तरूणांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

CNG Price Hike | मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ

Coffee | कॉफी प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका कमी होतो का? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर

Pimpri News | भाजपच्या विद्यमान नगरसेविका अर्चना बारणे यांचे निधन