JioFiber ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवीन ‘ट्रिपल प्ले’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JioFiber ची घोषणा झाल्यापासून, अन्य ब्रॉडबँड सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपन्या ‘ट्रिपल प्ले प्लान्स’ सुरू करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. बीएसएनएल आधीपासूनच बर्‍याच क्षेत्रातील ग्राहकांना ब्रॉडबँड आणि लँडलाईन सेवा प्रदान करते आणि आता केबल टीव्ही ऑपरेटरच्या मदतीने कंपनी एका बिलात तीन सेवा प्रदान करेल. 10 कोटी ग्राहक असणाऱ्या बीएसएनएल सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनीची अनेक राज्यांतील केबल टीव्ही ऑपरेटरची भागीदारी आहे.

बीएसएनएलने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरातसारख्या काही राज्यांमधील केबल सर्व्हिस प्रोव्हाईडर्ससह भागीदारी केली आहे. बीएसएनएल केबल टीव्ही ऑपरेटरला नवीन बॉक्स मिळविण्यात मदत करेल, जे JioFiber च्या ONT बॉक्स सारख्या तिन्ही सेवा प्रदान करेल.

बीएसएनएलकडे 10 दशलक्षाहून अधिक वायर्ड ब्रॉडबँड ग्राहक आहेत. परंतु बीएसएनएलची सेवा प्रदान करण्याची गती थोडी संथ आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांत परिस्थिती बिकट झाली आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की नवीन JioFiber योजनांमुळे Jio 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बीएसएनएलच्या पुढे जाऊ शकेल.

सध्या बीएसएनएल ग्राहकांना लँडलाईन आणि ब्रॉडबँड योजना देत आहे. पण जिओफायबरमध्ये लँडलाईन, ब्रॉडबँड आणि केबल टीव्ही सेवा 699 या सुरुवातीच्या किंमतीवर दिल्या जात आहेत. तथापि, जिओफायबर ग्राहकांना थेट टीव्ही पाहण्यासाठी स्वतंत्र एलसीओ कनेक्शन घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत केबल टीव्ही ऑपरेटरबरोबर भागीदारी केल्यानंतर बीएसएनएल जवळजवळ समान किंमतीत ट्रिपल प्ले सेवा प्रदान करू शकेल.

ट्रिपल प्ले’ प्लॅन अंतर्गत बीएसएनएल जिओफायबरसारख्या 100 एमबीपीएस वेगाने इंटरनेट प्रदान करण्यास सक्षम असेल. बीएसएनएलच्या नव्या ट्रिपल प्ले योजनेची प्रारंभिक किंमत 700 रुपयांपर्यंत असू शकते. कंपनीच्या या सेवा नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू केल्या जाऊ शकतात.