बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! BSNL नं अपडेट केला ‘हा’ प्लॅन, तब्बल 1095 GB डेटासह मोफत मिळणार Eros Now चं सबस्क्रिप्शन

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या १९९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र, प्लॅन अपडेट झाल्यावर मिळणाऱ्या सेवांच्या बद्दल जास्त बदल न करता, वापरकर्त्यांची गरज ओळखून एक बदल नक्की केलाय. चला तर जाणून घेऊया अपडेट केल्यानंतर या १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नक्की काय फायदा मिळतो…

कंपनीने १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटाच्या बाबत कोणताही बदल केला नाही. परंतु, यापुढे Lokdhun आणि Eros Now चे सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना फ्री देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या प्लॅनमध्ये Lokdhun चे एक वर्षासाठी तर Eros Now चे ६० दिवसांसाठी सबस्क्रिप्शन दिले जायचे. मात्र, आता नव्या बदलानुसार, Lokdhun चे ६० दिवसांसाठी आणि Eros Now चे एक वर्षासाठी सबस्किप्शन भेटणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून नवे अपडेट लागू करण्यात येईल, असे कंपनीने सांगितले आहे.

BSNL चा १९९९ रुपयांचा प्लॅन

३६५ दिवसांची वैधता असणाऱ्या या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी म्हणजे एकूण १०९५ जीबी डेटा मिळतो. त्याशिवाय सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. देशभरात हा प्लॅन आता उपलब्ध झाला आहे.