BSNL यूजर्संना अलर्ट ! एका SMS द्वारे तुमचे बँक खाते होऊ शकते पूर्ण रिकामे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन फसवणूकीमुळे सगळ्यात मोठी डोकेदुखी होत आहे. यावरून आता अलीकडे एक बँकिंग फसवणूक समोर आली आहे. तर सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या युजर्ससोबत फसवणूक केली जात आहे. यासंदर्भात सरकार आणि बँकांकडून वारंवार दक्ष केले जाते. त्याचप्रमाणे आताही कंपनीने आपल्या युजर्संना एका SMS फसवणूकीवरून दक्ष केलं आहे.

या संदर्भात कंपनीने सांगितले की, युजर्संनी आपली खासगी माहिती SMS च्याद्वारे देऊ नये. जर असे केले तर तुम्ही SMS फसवणूकीच्या जाळ्यात अडकू शकतात. फसव्या एसएमएस द्वारे केवायसीचा तपशील (KYC DETAILS) युजर्सकडून माहिती घेऊन त्यांच्या बँकेतील पैसे चोरू शकतात.

या संदर्भातील अधिक माहितीनुसार, फसव्या बीएसएनएल कर्मचाऱ्याचे नाव सांगून फोन करतात. केवायसी डिटेल्स नसल्याचे सांगून तुमचे सिम कार्ड सस्पेंड केले जात आहे. हे युजर्सच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी SMS द्वारे केवायसी डिटेल्सचा वापर करीत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे. तसेच SMS हेडर किंवा सेंडर आयडी सह कॅरेक्टर्स आहे. ज्यात कंपनीच्या नावाचा वापर करीत आहे. या पद्धतीने स्पॅम मेसेजच्या हेडर सीपी-एसएमएस,एफएसटी, एडी-विरिनएफ, सीपी-बीएलएमकेएनडी आणि BP-ITLINN आहे. बीएसएनएलने यूजर्सला या पद्धतीने मेसेजपासून लांब राहण्याचा सल्ला देत याबात जागृतही केले आहे.