BS VI वाहनांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, जाणून घ्या अन्यथा होईल कमालीचं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही BS IV मानकाची कोणतीही गाडी खरेदी करु इच्छित असाल तर सावध. सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आहे आणि याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. न्यायालयाचा नवा आदेश तुमच्यासाठी फायद्याचा आणि तोट्यांचा देखील ठरु शकतो.

31 मार्चापासून BS IV मानकाच्या वाहनावर बंदी –
31 मार्चपर्यंतच BS IV वाहनांची विक्री करता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे कार कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. 31 मार्च नंतर बीएस 4 वाहनांची विक्री करता येणार नाही. त्यानंतर फक्त बीएस – 6 इंजिन असलेल्या वाहनांची विक्री कंपन्या करु शकतात.

एप्रिलपर्यंत BS IV ची वाहन विकण्याची परवानगी मिळावी अशी मागणी वाहन निर्मिती कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयकडे केली होती मात्र ही मुदत न वाढवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. तसेच 1 एप्रिल पासून फक्त बीएस 6 वाहनांची विक्री करता येईल असा निर्णय दिला आहे.

तुमच्यावर काय होणार परिणाम –
नव्या निर्णयानुसार आता कंपन्यांना BS IV मार्केटमधून पुन्हा मगावून घ्यावी लागतील. याचा फायदा हा असेल की वाहन निर्मात्या कंपन्यांना 31 मार्चपर्यंत वाहन विकण्याचा दबाव असेल. त्यामुळे ग्राहकांना या वाहनांवर भरघोस सूट मिळू शकते, परंतु जे ग्राहक पुढील 3 – 6 महिन्यानंतर वाहन खरेदी करण्याच्या विचारात असतील त्यांना आता सध्याच्या दरानुसार वाहन खरेदी करणं महागेल. कारण 1 एप्रिलपासून BS IV वाहन विकणं बंधनकारक असेल. त्यामुळे वाहनाचे दर देखील वाढतील.

सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2018 सालीच निर्णय दिला होता की 31 मार्च 2020 नंतर BS IV वाहनांचे रजिस्ट्रेशन आणि विक्री बंद करण्यात यावी. या आदेशावर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्सने याचिका दाखल केली होती की डेडलाइन एक महिना वाढवण्यात यावी, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका रद्दबातल ठरवली.

You might also like