नायगाव येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे बुद्ध पोर्णिमा उत्सहात साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी सचिन जगताप यांनी केली. सकाळी १० : ०० वाजता महापूजा करण्यात आली.

सकाळी ११:३० वाजता श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची महाआरती झाली. कोरोनाच्या सावटामुळे सर्व प्रकारची काळजी घेऊन पोर्णिमा साजरी करण्यात आली. अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहीती ट्रस्टचे सचिव राहुल कड यांनी दिली. करोनाचे संकट लवकर जावे आशी ग्रामस्थांच्या वतीने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना पार्थना करण्यात आली.