Builder Amit Lunkad Latest News | बिल्डर अमित लुंकड यांचा न्यायालयात जामीनासाठी अर्ज; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या जामीनासाठी (Bail Order) शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात (Shivajinagar Court) जामीन अर्ज (Bail Application) दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्जाबाबत न्यायालयानं पोलिसांकडून त्यांचं म्हणणं (IO to Say) देखील मागवलं आहे. सोमवारी बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात (yerwada police station) फसवणूकीचा गुन्हा (Cheating case) दाखल आहे. दरम्यान, लुंकड (Builder Amit Lunkad) यांनी फसवणूक केल्याच्या तब्बल 35 तक्रारी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (economic offences wing pune) आलेल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना बिल्डर लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्यामार्फत काही रक्कम अदा करण्यात येत असून उर्वरित रक्कमेचा पोस्ट डेटेड चेक देण्यात येत असून त्याची हमी देखील लुंकड यांच्या मित्रांकडून आणि आप्तांकडून दिली जात आहे.

येरवडा पोलिस ठाण्यात (yerwada police station) संजय होनराव (48) Sanjay Honrao यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लुंकड रियालिटी (lunkad realty) फर्मचे अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा (cheating case) दाखल झालेला आहे. प्रकरणाचा तपास पुण्याच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे senior police inspector balaji Pandhare. करत असताना लुंकड यांच्याविरूध्द फसवणूकीच्या आणखी तक्रार येण्यास सुरवात झाली. गुन्हयाची व्याप्ती पाहून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी लुंकड (Lunkad) यांच्याविरूध्द येणार्‍या तक्रारीची नोंद करून घेण्याबाबत आणि तपासाबाबत आर्थिक गुन्हे शाखेला (economic offences wing pune) सुचना दिल्या.

त्यानुसार आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत (economic offences wing pune) लुंकड यांच्याविरूध्द तब्बल 35 पेक्षा अधिक तक्रारीची नोंद आहे.
फसवणूकीचा आकडा सुमारे 50 कोटींच्या घरात असल्याची देखील माहिती समोर आली होती.
ठेवी स्विकारण्याचा काही एक अधिकार नसताना बिल्डर लुंकड (Builder Amit Lunkad) यांनी जादा व्याजाच्या आमिषाने सर्वसामान्यांकडून मोठया प्रमाणात ठेवी स्विकारल्या होत्या.
त्यामुळे पोलिसांनी बिल्डर लुंकड यांच्याविरूध्द एमपीआयडी अंतर्गत देखील कलम लावले आहे.
सध्या बिल्डर लुंकड यांचा मुक्काम येरवडा जेलमध्ये (yerwada jail) आहे.
दरम्यान, लुंकड यांना जामीन मिळावा म्हणून शिवाजीनगर न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे.
जामीन अर्जावर पोलिसांचं काय म्हणणं आहे याबाबत न्यायालयाकडून पोलिसांना विचारना (IO to Say) करण्यात आली आहे.
सोमवारी बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मात्र, बिल्डर अमित लुंकड यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक झाल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

Web Title :- Builder Amit Lunkad’s bail application will be heard in Shivajinagar court on Monday

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ED चा ‘छापा’; 100 कोटीच्या वसुली प्रकरणाचा सुरुय तपास

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा