Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांना गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून enforcement directorate (ईडी) ED चौकशीसाठीचे समन्स बजावले होते. त्यानंतर शुक्रवारी भोसले यांचा मुलगा अमित अविनाश भोसले (Builder Amit Avinash Bhosale) याची ईडीने 6 ते 7 तास चौकशी केली. त्याचबरोबर चौकशीसाठी पुन्हा हजार राहण्यास सांगितले आहे. builder avinash bhosales son amit questioned by enforcement directorate (ED)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ईडीने समन्स (ed summons) बजावल्यानांतर अमित अविनाश भोसले (Amit Avinash Bhosale) शुक्रवारी दुपारी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर झाला. त्याच्याकडे ६ ते ७ तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेच काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते. काही कागदपत्रांसमवेत अमितला आज पुन्हा हजर राहण्यास सांगितले आहे. निवासी इमारतीच्या जागी अवैध इमारत बांधल्याचा ठपका भोसलेच्यावर ईडीने ठेवला आहे. संबंधित जमीन खरेदीसाठी बेकायदा व्यवहार केल्याचा आरोपही भोसलेवर आहे. यापूर्वी ईडीने फेमा कायद्यांतर्गत (fema act) भोसले यांची पुणे व नागपुरातील मालमत्ता (nagpur property) जप्त केली आहे.

Web Title : Builder Avinash Bhosale | builder avinash bhosales son amit questioned by enforcement directorate (ED)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे