Builder DS Kulkarni Case |: डीएसके पुन्हा अडचणीत! कंपनीचा शेअर होणार शून्य किंमतीचा, शेअरधारकांचे पैसे बुडणार?

पुणे : Builder DS Kulkarni Case | गुंतवणुकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मोठा धक्का बसणार आहे (DSK Case). कारण डीएसकेडीएल कंपनीच्या शेअर्सची किंमत आता शून्य होणार आहे. तसेच कंपनीचे अस्तित्व सुद्धा संपणार आहे. यामुळे कंपनीत गुंतवणूक केलेल्या गुंतावणुकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

सध्या जामिनावर सुटलेल्या डीएसकेंसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. (Builder DS Kulkarni Case)

मुंबईतील अंशदान प्रॉपर्टी लिमिटेड या कंपनीने डीएसकेडीएल कंपनीचा ताबा घेतला आहे. यासंबंधी झालेल्या करारानुसार डीएसकेडीएल कंपनीचे शेअर्स शून्य होतील. २१ सप्टेंबर रोजी २.५० कोटी शेअर्सची किंमत शून्य होईल. तसेच कंपनीचे अस्तित्व देखील संपुष्टात येईल. यामुळे शेअरधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डी. एस. कुलकर्णी यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या मालमत्ता विकत घेण्याचे प्रयत्न अनेक बांधकाम व्यावसायिक करत आहेत. या प्रकाराबाबत गुंतवणुकदारांनी आरोप केला आहे की, या मालमत्ता विकून मिळणाऱ्या पैशातून सामान्य गुंतवणूकदारांची देणी भागवण्याऐवजी कवडीमोल दराने डीएसकेंच्या मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे.

२०१९ मध्ये झाली होती अटक

पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबर २०१८ रोजी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी यांच्यावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक प्रकरणी या गुन्ह्यात डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांना मार्च २०१९ मध्ये अटक केली होती.

काय आहे डीएसके प्रकरण

कंपनी तेजीत असतना डीएसके यांनी मुदत ठेवी घेण्यास सुरूवात केली होती.
चांगल्या रिटर्नच्या अपेक्षेने गुंतवणुकदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता.
सुमारे १ हजार ११५ कोटी रुपये गुंतवणुकदारांनी या कंपनीत गुंतवले होते.
परंतु हे पैसे गुंतवणुकदारांना मिळाले नाहीत.

डीएसकेंच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुद्धा गुंतवणुकदारांना असाच अनुभव आल्याने अनेक गुंतवणुकदार हतबल झाले,
त्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. अखेर गुंतवणुकदार एकत्र आल्यानंतर चौकशी सुरू झाली
आणि मोठा घोटाळा बाहेर आला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray Shivsena | ठाकरेंच्या शिवसेना उपनेत्याचे राजीनामास्त्र, विजयाची खात्री असलेल्या लोकसभा मतदारसंघात मोठा पेच, कारण…