देशातील ‘या’ 7 मार्गावरून धावणार हाय स्पीड Bullet Train, रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती, जाणून घ्या रूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bullet Train | अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेननंतर आता नागपूर – मुंबई मार्गावरही हायस्पीड बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. सर्व काही सुरळीत सुरू आहे. या मार्गाचे बांधकाम सन 2024 पासून सुरू होईल. (Bullet Train)

 

2024 निवडणुकांपूर्वी बांधकाम होणार सुरू
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, जर महाराष्ट्र सरकार आणि अहमदाबाद मार्गासारखी कोणतीही अडचण आली नाही, तर 2024 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका सुरू होण्यापूर्वी या मार्गाचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीअखेर नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन मार्गाचा डीपीआर तयार होईल, त्यासाठी लागणारी 70 टक्के जमीन आधीच उपलब्ध आहे. (Bullet Train)

 

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन (Mumbai to Nagpur bullet train)
फक्त 30 टक्के भूसंपादन करावे लागणार आहे, ही बुलेट ट्रेन धावल्यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास काही तासात पूर्ण होणार आहे, नागपूर ते मुंबई हे 12 तासांचे अंतर अवघ्या 3.5 तासात पूर्ण होणार आहे. मुंबई ते नागपूर या 766 किमी अंतराच्या बुलेट ट्रेनच्या मार्गाचा डीपीआर तयार केला जात असून, फेब्रुवारीच्या अखेरीस डीपीआर तयार होण्याची शक्यता आहे.

 

नागपूर ते इगतपुरी दरम्यान यासाठी भूसंपादनाची गरज भासणार नाही, फक्त इगतपुरी ते मुंबई दरम्यान, ज्या भागात जमीन संपादित करायची आहे, त्या भागात किमान जमीनही घेतली जाणार आहे, या भागात बुलेट ट्रेनची बहुतांश मार्ग एलिव्हेटेड केला जाईल बुलेट ट्रेनचा कमाल वेग 350 किमी प्रतितास असेल.

 

रेल्वे मंत्रालयाने 7 हायस्पीड रेल (Bullet Train) कॉरिडॉरसाठी दिल्ली – वाराणसी, मुंबई – नागपूर, दिल्ली – अहमदाबाद, मुंबई – हैद्राबाद, चेन्नई – बेंगळुरू – म्हैसूर, वाराणसी – हावडा आणि दिल्ली – अमृतसरसाठी साठी सर्वेक्षण करणे आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai to Ahmedabad bullet train)
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन मार्गाचे बांधकाम गुजरात प्रदेशात वेगाने सुरू असताना, गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे, महाराष्ट्रात ते प्रलंबित आहे.

 

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील बुलेट ट्रेनसाठी निश्चित केलेले 7 मार्ग –

1. मुंबई – अहमदाबाद
2. दिल्ली – नोएडा – आग्रा – लखनौ – वाराणसी (865 किमी)
3. दिल्ली – जयपूर – उदयपूर – अहमदाबाद (886 किमी)
4. मुंबई – नाशिक – नागपूर (753 किमी)
5. मुंबई – पुणे – हैद्राबाद (711 किमी)
6. चेन्नई – बेंगळुरू – म्हैसूर, (435 किमी)
7. दिल्ली – चंदीगड – लुधियाना – जालंधर – अमृतसर (459 किमी).

 

Web Title :- Bullet Train | high speed bullet will pass through these seven routes of the country

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा