Amul चा दबदबा कायम, जगातील टॉप 20 डेअरी कंपन्यांमध्ये सामील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात घराघरात आपलं स्थान निर्माण करणारी ‘अमूल’ आता संपूर्ण जगात आपलं स्थान निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. 1946 मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा म्हणून केला गेलेला प्रयत्न आज जगातील टॉप 20 ब्रँड मध्ये सहभागी झाला आहे. रोबोबँकच्या जगातील सर्वात मोठ्या 20 डेअरी कंपन्यांमध्ये अमूल 16व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे अमूलची प्रगती जर याच गतीने होत राहिली तर लवकरच अमूल टॉप 10 मध्ये येण्याची शक्यता आहे. कारण अमूलच्या पुढे असणाऱ्या कंपन्यांनाचा टर्नओवर अमूलच्या टर्नओवर पेक्षा खूप लांब नाही. ही यादी 2019 च्या टर्नओवरच्या आकडेवारी नुसार आहे.

गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन जे अमूल ब्रँडचं उत्पादन करतं, 5.5 अरब डॉलर डेअरी टर्नओवर सोबत यादीत 16 व्या स्थानी आहे. तर यादीत 11 व्या स्थानी जर्मनीची डिएमके आहे जिचा टर्नओवर 6.5 अरब डॉलर इतका आहे. 11 ते 16 व्या स्थानावर असणाऱ्या कंपन्यांनाचा टर्नओवर 5.5 ते 6.5 अरब डॉलरच्या मध्ये आहे. या यादीत पहिल्या स्थानावर स्वित्झर्लंडची नेस्ले कंपनी आहे, जिचा एक वर्षाचा टर्नओवर 22.1 अरब डॉलर इतका आहे. तर दुसऱ्या स्थानावर 21 अरब डॉलर टर्नओवर सोबत फ्रान्सची Lavalis ही कंपनी आहे आणि तिसऱ्या स्थानी अमेरिकेची डेअरी फार्मर ऑफ अमेरिका ही कंपनी आहे जिचा टर्नओवर 20 अरब डॉलर इतका आहे. या संपूर्ण यादीत फ्रान्सच्या 4, अमेरिकेच्या 3, चीन, नेदरलँड, जर्मनी ,कॅनडा यांच्या प्रत्येकी 2 कंपन्यांचा समावेश आहे. भारत, स्वत्झर्लंड, न्यूझीलंड, डेन्मार्क आणि जपान यांची प्रत्येकी एक कंपनी सहभागी आहे.

अमूलचे भारतात काय योगदान आहे याबद्दलची झलक मागच्या आठवड्यात पाहायला मिळाली, जेव्हा अमूलने दूध विक्रीतून लाखो रुपये कमावणाऱ्या महिलांची कहाणी शेअर केली. यामध्ये पहिल्या स्थानावर असणाऱ्या महिलेने दूध विक्रीतून एका वर्षात जवळजवळ 88 लाख रुपये कमावले. यापैकी अर्ध्या महिलांची मागच्या वर्षातील कमाई 50 लाख इतकी होती. अमूलने दूध उत्पादकांना बाजारात स्थान मिळवून दिलं त्याचा फायदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे.