Business Idea | केवळ 25,000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट बिझनेस, दरमहिना होईल लाखो रुपयांची कमाई

नवी दिल्ली : Business Idea | जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी बिझनेस आयडिया सांगणार आहोत, जी तुम्ही माफक गुंतवणूक करून सुरू करू शकता. या व्यवसायाशिवाय लोकांचा नाश्ता अपूर्ण आहे. पोहा मॅन्युफॅक्चरिंग (Poha Manufacturing) युनिटबद्दल आम्ही सांगत आहोत. हा एक चांगला व्यवसाय आहे. दर महिन्याला त्याची मागणी असते. हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोक दर महिन्याला मोठ्या प्रमाणत याचे सेवन करतात. अशावेळी या व्यवसायासाठी विशिष्ट ऋतू महत्वाचा नाही. (Business Idea)

पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. हे मुख्यतः नाश्ता म्हणून खाल्ले जाते. हे बनवायला आणि पचायला दोन्ही सोपे आहे. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. अशावेळी तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. (Business Idea)

खर्च

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (Khadi and Village Industries Commission/KVIC) प्रकल्प अहवालानुसार, एका पोहा उत्पादन युनिटची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90% पर्यंत कर्ज मिळेल. पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी साहित्याची गरज

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. KVIC अहवालात असे सांगण्यात आले आहे की, या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. त्यामुळे अनुभवही चांगला येईल, तसेच व्यवसायही वाढेल.

असे मिळेल कर्ज

KVIC नुसार, जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी केव्हीआयसी कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

किती होईल कमाई

प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागतो. यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च करावे लागतील.
याशिवाय तुम्हाला सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागतील.
अशा प्रकारे तुम्ही सुमारे 1000 क्विंटल पोहे तयार कराल.
ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. 1000 क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांना विकले जाऊ शकतात.
म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता.

Web Title :-  Business Idea | business idea poha manufacturing unit kvic report earn good profit know how to start

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Share Market | ‘या’ आठवड्यात कशी होईल शेअर मार्केटची वाटचाल? हे फॅक्टर लक्षात घेऊन करा गुंतवणूक

Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारु, काँग्रेस नेत्यासमोर रिफायनरी विरोधकाची धमकी

Fitness Tips | नेहमी रहायचे असेल फिट तर अवलंबा ‘या’ 5 सोप्या टिप्स, काही दिवसात दिसेल फरक