Business Idea | ‘या’ फूलाच्या शेतीतून करा लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात

नवी दिल्ली : Business Idea | जर तुम्हाला अतिशय कमी पैसे लावून एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी बिझनेस आयडिया सांगणार आहोत ज्यामध्ये अतिशय कमी भांडवलात लाखो रूपयांची कमाई करू शकता. हा बिझनेस रजनीगंधाच्या फूलांच्या शेतीचा आहे. रजनीगंधाची फूले दिर्घकाळ सुगंधित आणि ताजी राहतात. यासाठी त्यांना बाजारात चांगली (Tuberose Farming Rajanigandha Flower) मागणी आहे. (Business Idea)

 

रंजनीगंधाची उत्पत्ती मॅक्सिको देशात झाली आहे. हे फूल एमरिलिडिएसी कुळातील वनस्पतीचे आहे. भारतात त्याची शेती पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांत केली जाते.

 

कशी करावी शेती

ही करण्यापूर्वी प्रति एकरच्या हिशेबाने शेतात 6-8 ट्रॉली चांगले शेणखत टाकावे. सोबत एनपीके किंवा डीएपी सारख्या खतांचा सुद्धा वापर करू शकता. याची शेती बटाट्यासारखी कंदापासून होते आणि एका एकरात सुमारे 20 हजार कंद लावले जातात. नेहमी ताजे आणि मोठे कंद लावा. जेणेकरून फूलांच्या शेतीत तुम्हाला चांगले पिक मिळेल. भारतात रजनीगंधीच्या फूलांची शेती सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात होत आहे. फ्रान्स, इटली, दक्षिण अफ्रिका, अमेरिका इत्यादी देशात सुद्धा याची शेती केली जाते. (Business Idea)

 

किती होईल कमाई

जर तुम्ही एक एकरात रजनीगंधाची शेती केली तर रजनीगंधा फूलाच्या सुमारे 1 लाख स्टीक मिळतात.
हे तुम्ही जवळपासच्या बाजारात विकू शकता. जर जवळपास एखादे मंदिर,
फूलाचे दुकान असेल तर तिथे तुम्हाला चांगला दर मिळू शकतो.

 

रजनीगंधाचे एक फूल 1.50 ते 8 रूपयांपर्यंत विकले जाते.
मागणी किती आहे यावर हे अवलंबून आहे.
म्हणजे तुम्ही 1.50 ते 6 लाख रूपयांची कमाई केवळ एक एकरात रजनीगंधाच्या फूलांच्या शेतीतून करू शकता.

 

Web Title :- Business Idea | business idea start tuberose farming rajanigandha flower earning lakh rupees know how to start

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा