Business Idea | कमी मेहनतीत ‘या’ व्यवसायातून वार्षिक करा 25 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Business Idea | एका अशा बिझनेस (Business Idea) बाबत आपण जाणून घेणार आहोत ज्यामध्ये मागणी नेहमी मोठी असते आणि नुकसान सुद्धा खुपच किरकोळ असते. तो व्यवसाय बटाट्याची शेती (Potato Farming) आहे. होय, बटाट्याला 12 महीने मागणी कायम असते, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नसते. बटाट्याची शेती करून अनेक शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत. कमी खर्चात जास्त नफा (Profitable Farming) देणार्‍या बटाट्याच्या शेतीबाबत जाणून घेवूयात…

हारच्या मधुबनी जिल्ह्यात राहणारे शेतकरी अशोक कुमार यांनी नवीन अधुनिक युगात नव्या पद्धतीने शेतीचे महत्व जाणल्याने आज ते वार्षिक 50 लाख रुपयांपर्यंत कमावतात.
त्यांना वार्षिक एकुण 50 लाख रुपयांचे उत्पन्न होते आणि जवळपास 25 लाख रुपये खर्च होतात.
अशाप्रकारे त्यांना 25 लाख रुपये शुद्ध नफा मिळतो.

कोणत्या मातीत घेतात पिक?

बटाट्याचे पिक सर्व मातीत घेतात. परंतु यासाठी वालुकामय माती चांगली ठरते.
रोगमुक्त बियाणे वापरावे. योग्यवेळी कीटनाशक आणि खत द्यावे.

लागवडीची योग्य पद्धत

बटाट्याचे पिक घेताना दोन रोपांमधील अंतर महत्वाचे ठरते, यामुळे रोपाला प्रकाश, पाणी, पोषकतत्व सहज मिळतात.
वाफ्यांमधील अंतर किमान 50 सेंटीमीटर तर दोन रोपांमधील अंतर 20-25 सेंटीमीटर असावे.
यापेक्षा कमी अंतर ठेवले तर बटाट्याची साईज छोटी होईल आणि जास्त अंतर ठेवले तर आकार मोठा, पण उत्पन्न कमी होईल.

 

कधी द्यावे खत आणि पाणी

या पिकात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटाश योग्य प्रमाणात टाका.
रोपे उगवल्यानंतर त्यांची प्रथम लागवड करावी. यानंतर 15 दिवसानंतर दुसर्‍यांदा रोपांना पाणी द्यावे.
ही प्रक्रिया दर 10 ते 12 दिवसांनी करावी.

कुठे विकातात पिक

पिक बाजारात विकू शकता, परंतु येथे अडचण ही असते की दलाल आणि एजंटमुळे योग्य किंमत मिळत नाही.
यासाठी अशा मॅन्युफॅक्चर्सकडे संपर्क करा जे बटाटे आणि त्याच्याशी संबंधीत प्रॉडक्ट बनवतात.
सरकारी विभाग आणि बेवसाइटशविाय इंटरनेटवर याबाबत माहिती मिळेल.
पण एकाच ठिकाणी देशातील मोठे मॅन्युफॅक्चर्स शोधायचे असतील तर potatopro.com वर जाऊ शकतो.

या कंपन्यांकडे करू शकता संपर्क

आयटीसी, बीकानेर, बिकानोसह काही मोठ्या कंपन्या बटाटा चिप्स आणि याच्याशी संबंधीत उद्योग करतात. जर शेतकर्‍यांनी थेट या कंपन्यांकडे संपर्क केला तर दर चांगला मिळू शकतो.

 

Web Title : business idea | business opportunity you can start potato farming business and earn 25 lakh rupess yearly

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narayan Rane Arrested | अटक केल्यानंतर नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Anti Corruption | 40 हजाराची लाच घेणार्‍या पुणे मनपाच्या उप अभियंत्यास पोलिस कोठडी

Murder in Pune | अनैतिक संबंधातून महिलेचा खून, शरिराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात फेकले; प्रचंड खळबळ