Whatsapp-Facebook वर बंदी घाला, व्यापार्‍यांचे मोदी सरकारला पत्र

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  Whatsapp हे संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतला असून आता प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोप असेल अशा अ‍ॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (Confederation of All India Traders) व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याबाबत CAIT ने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सरकारने व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखले पाहिजे अथवा व्हॉट्सअ‍ॅपवरच बंदी घातली पाहिजे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीचा पर्सनल डेटा हा अत्यंत महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे CAIT ने आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने बुधवारी युजर्संना पॉपअ‍ॅप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितले आहे. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अ‍ॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाणार असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोप असेल अशा अ‍ॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान अल्पावधीतच एका अ‍ॅपची क्रेझ वाढली आहे. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसत आहे.