कर्करोगग्रस्त रुग्णांनी ‘अशी’ घ्यावी केसांची अन् त्वचेची काळजी !

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कर्करोगाच्या उपचार पद्धतीत रुग्णाला अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. यापैकी एक उपचार पद्धती असणाऱ्या किमोथेरपीत तर केस गळताना दिसतात. शल्यक्रिया, रेडिएशन थेरपी, स्टिरॉईड्स आणि इतर एजंट्सचा वापर केल्यानं त्याचा परिणाम रुग्णांच्या त्वचेवर आणि केसांवर होतो.

कर्करोगाच्या उपचारांपूर्वी, उपचारादरम्यान आणि नंतर त्वचेची आणि केसांची निगा राखण्याबाबत रुग्णांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कर्करोगग्रस्तांनी त्वचेची आणि केसांची काळजी कशी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहे. सदर माहिती तज्ज्ञांनी दिलेली आहे.

ADV

कर्करोगग्रस्त रुग्णांनी ‘अशी’ घ्यावी स्वत:ची काळजी

1) आपल्या संवेदनशिल त्वचेसाठी दैनंदिन मॉईश्चरायजिंग रूटीन कायम ठेवावं. सौम्य हायड्रेटींग आणि हायपोलेर्जेनिक उत्पादन वापरून पहा. ही काळजी घेण्याची पहिली पायरी आहे अंस म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

2) सुगंधित, अल्कोहोलयुक्त, प्रीझर्वेटीव, इसेंशियल ऑईल अशी उत्पादनं वापरू नका. कारण त्यात एलर्जीन आहे. त्यामुळं त्वचेची जळजळ होण्याची शक्यता असते.

3) जास्त गरम पाण्यानं अंघोळ करू नका. त्यामुळं त्वचेतील आर्द्रता कमी होते.

4) शॉवरींगच्या 10 मिनिटात हायड्रेटींग मॉईश्चरायजर लावावा.

5) हाता-पायांची निगा राखा.

6) अमोनियम लेक्टेट असलेली क्रीम त्वचेतील ओलावा वाढवते. त्यामुळं कोरड्या त्वचेसाठी ती फायदेशीर ठरते.

7) कर्करोगग्रस्तांनी सुर्यापासून संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. बाहेर पडताना एसपीएफ असलेली चांगली सन्सक्रीन लावावी. त्यात झिंक, ऑक्साईड, टायटॅनियम डॉयऑक्साईड किंवा एव्होबेन्झोन असावं. दर 2 तासांनी सनस्क्रीन लावावी. बाहेर जाताना टोपी, हातमोजे, संरक्षणात्मक चष्मा लावावा.

8) स्क्रब, एएचए, रेटीनॉल आणि ग्लायकोलिक अ‍ॅसिड वापरणं बंद करावं.

9) मुरूमांवर उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेण्यात येणारी प्रतिजैविकं किंवा सौम्य अँटीकॅसिन क्रीम वापरा. ओटीसी क्रीम खरेदी करणं टाळा ज्यात बेंझॉयल पेरोक्साईड किंवा सॅलिसिक अ‍ॅसिड यांचा समावेश असेल. कारण त्यामुळं त्वचा कोरडी पडते. कर्करोगाचा उपचार थांबवल्यानंतरही त्वचेची योग्य काळजी घ्यावी. यासाठी तु्म्ही डॉक्टरांचीही मदत घेऊ शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.