Captain Miller | साऊथचा आणखी एक जबरदस्त ॲक्शन सिनेमा; धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’चा टीझर आऊट

पोलीसनामा ऑनलाइन – Captain Miller Movie| दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) याचा आज वाढदिवस आहे. धनुषचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची (Dhanush Upcoming Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच तो जबदरस्त ॲक्शन फिल्म ‘कॅप्टन मिलर’मध्ये (Captain Miller Movie) झळकणार आहे. य़ामध्ये धनुष हटके अंदाज मध्ये दिसून येणार आहे. अभिनेता धनुषच्या वाढदिवसानिमित्त (Dhanush Birthday) आज (दि.28) ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाचा टीझर रिलीज (Captain Miller Teaser Out) करण्यात आला आहे. या टीझरला अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो व्ह्युज मिळाले असून प्रेक्षकांना धनुषच्या आगामी चित्रपटाचा टीझर आवडला आहे.

अभिनेता धनुष त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘कॅप्टन मिलर’च्या टीझरमध्ये देखील त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. दीड मिनिटांचा हा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये हाय वोल्टेज ड्रामा व किलर फायटिंग आणि ॲक्शन सीन बघायला मिळत आहे. यामधील सर्वात आकर्षक ठरत आहे तो म्हणजे अभिनेता धनुषचा हटके लूक (Dhanush Look Captain Miller). या आधी धनुषला अशाप्रकारच्या लूकमध्ये कधीच चाहत्यांनी पाहिले नव्हते. कॅप्टन मिलरमध्ये धनुषची जबरदस्त बॉडी, वाढलेली दाढी व केसांचा बांधलेला जुडा अशा पद्धतीचा लूक देण्यात आला. टीझरमध्ये धनुष हातात बंदुक. कुऱ्हाड अशी हत्यारे घेत फायटिंग करताना दिसत आहे. टीझरवरुन तरी चित्रपटामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवण्यात आला असल्याचे चित्र आहे. मात्र चित्रपट नक्की कशावर आहे हे नंतरच लक्षात येईल.

‘कॅप्टन मिलर’ या बहुचर्चित चित्रपटाच्या टीझरने सर्वांनाच अवाक केले.
खास करुन धनुषच्या चाहत्यांसाठी तर हा चित्रपट एक पर्वणीच ठरणार आहे.
दाक्षिणात्य चित्रपट प्रत्येक वेळी एक नवी उंची गाठताना दिसत आहेत.
‘कॅप्टन मिलर’च्या टीझरने हे लक्षात येत आहे की पुष्पा (Pushpa), केजीफ (KGF) यांसारख्या चित्रपटांप्रमाणे ‘कॅप्टन मिलर’
चित्रपट (Captain Miller Movie) देखील देशभर धुमाकूळ घालणार आहे. ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अरुण माथेस्वरन (Arun Matheswaran) यांनी केले असून सेंथिल (Sendhil Thiyagarajan) आणि अर्जुन त्यागराजन (Arjun Thyagarajan) यांनी चित्रपटची निर्मिती केली आहे. यामध्ये अभिनेता धनुष सोबत शिवा राजकुमार (Shiva Rajkumar), संदीप किशन (Sundeep Kishan) व प्रियांका मोहन (Priyanka Mohan) या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. बहुप्रतिक्षित हा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस (Captain Miller Release Date) येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोने आणि चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Maharashtra Politics News | शिंदे गटातील आमदाराचे विधान; म्हणाले, – “अजित पवार निश्चित मुख्यमंत्री…”

Pune Cyber Crime | कॉसमॉस बँकेप्रमाणे भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला ! दुसर्‍या बँकेची 439 कार्ड क्लोन करुन 1 कोटी रुपये हडपले