Maharashtra Politics News | शिंदे गटातील आमदाराचे विधान; म्हणाले, – “अजित पवार निश्चित मुख्यमंत्री…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल मोठे विधान केले आहे. अजित पवार महाराष्ट्रातील (Maharashtra Politics News) लोकप्रिय नेते आहेत. अजित पवार यांना आज ना उद्या मुख्यमंत्रीपदाची (CM) संधी मिळेल,’ असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगल्या. दरम्यान या विधानावर शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिली.

यावेळी आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील. भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पण, 2024 पर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री आहेत. आणि भविष्यात म्हणजे 5 ते 10 वर्षानंतरही अजित पवार मुख्यमंत्री (Maharashtra Politics News) होतील. ते आता कसे वर्तवता येईल. असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल?

अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार? असा प्रश्न विचारला असता नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की,
“आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करताय? आज अजित पवार महाराष्ट्रातील एक वजनदार आणि लोकप्रिय
नेते आहेत. आमच्या पक्षाचे नेतृत्व अनेक वर्षापासून ते करत आले आहेत.
त्यामुळे आज ना उद्या अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोने आणि चांदीचा भाव काय? जाणून घ्या