फेस्टिव्ह सिझनमध्ये कोणती बँक देतीय सर्वात स्वस्त कार लोन, इथं वाचा संपर्णू यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणाच्या हंगामात लोक मोठ्या प्रमाणात मोटारी खरेदी करतात. बरेच लोक कर्ज घेऊन कार खरेदी करतात. अशा परिस्थितीत बँका या काळात ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑफरदेखील देतात. म्हणून कार कर्ज घेण्यापूर्वी, व्याज दर आणि प्रक्रिया शुल्क याबद्दल जाणून घ्या. चला जाणून घेऊया, कोणती बँक कोणत्या दराने कर्ज देत आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 7.70 ते 11.20 टक्के व्याज दराने कार कर्जे देत आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.20 ते 0.50 टक्के (जास्तीत जास्त 5000 रुपये) + जीएसटी आहे.

आयसीआयसीआय (ICICI) बँक कार कर्ज 7.90 ते 8.80 टक्के व्याजदराने देत आहे. येथे प्रक्रिया शुल्क 3,500 ते 8,500 रुपये आहे, जे कर्जाच्या रकमेवर आधारित आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) 6.85 ते 7.80 टक्के व्याज दराने कार कर्जे देत आहे. येथे प्रक्रिया शुल्क प्रति अर्ज 500 रुपयांपर्यंत आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) 7.15 ते 7.50 टक्के व्याज दराने कार कर्जे देत आहे, येथे प्रक्रिया शुल्क 1000 रुपये + जीएसटी आहे.

पंजाब आणि सिंध बँक (PSB) कार कर्ज 7.10 ते 7.45 टक्के व्याज दराने देत आहे. येथे उत्सवाच्या हंगामात प्रक्रिया शुल्कात पूर्णपणे सूट दिली जात आहे.

बँक ऑफ बडोदा (BOB) 7.25 ते 10.25 टक्के व्याज दराने कार कर्जे देत आहे. त्याचवेळी, प्रक्रिया फी कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के (किमान 2,500 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपये) + जीएसटी आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB) 7.30 ते 7.80 टक्क्यांपर्यंत कार कर्जावरील व्याज दर देत आहे. प्रक्रिया शुल्कात 31 डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण सूट आहे.

त्याचवेळी HDFC बँक 8.80% ते 10% व्याजावर कार कर्जे देत आहे. प्रक्रिया शुल्क म्हणून बँक एकूण मान्यता रकमेपैकी 0.4% शुल्क आकारते.