Castor Oil Hair Mask : केवळ एरंडाचे तेल नव्हे, आता लावा याचा हेयर मास्क, दूर होईल केसांची प्रत्येक समस्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कॅस्टर ऑईलला एरंडाचे तेल सुद्धा म्हटले जाते. केसांची मजबूती आणि हेयर फॉल रोखण्यासाठी कॅस्टर ऑईल खुप लाभदायक मानले जाते. आज आम्ही तुम्हाला कॅस्टर ऑईलचा हेयर मास्क बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. जे लावल्याने उन्हाळ्यात उन्हापासून केसांचे नुकसान होणार नाही. कॅस्टर ऑईल हेयर मास्क कसा तयार करायचा ते जाणून घेवूयात –

साहित्य
कॅस्टर ऑईल- 2 चमचे
मोहरीचे तेल – 1 चमचे
कांद्याचा रस – 2 चमचे

कृती
या सर्व वस्तू चांगल्या प्रकारे मिक्स करा. नंतर केसांना लावा आणि 40 मिनिटांपर्यंत केसावर राहू द्या. यानंतर केस एखाद्या चांगल्या शॅम्पूने धुवून घ्या. चांगल्या परिणामांसाठी मास्क आठवड्यात 2 वेळा लावा. कॅस्टर ऑईल खुप चिकट आणि जाड असते. यासाठी थेट केसावर वापरून नये. यामध्ये इतरही तेल मिसळा.

या समस्या होतील दूर
– केस गळणे
– केस सफेद होणे
– डँड्रफची समस्या
– कोरडे बाल
– स्कॅल्प इन्फेक्शन