भुवयांवर वारंवार मुरुम, पिंपल्स येतात का ? करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तणाव, अन्न, प्रदूषण, तेलकट त्वचा, मेकअप आणि हार्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम येणे सामान्य आहे. परंतु, बर्‍याच वेळा एकाच ठिकाणी मुरुम पुन्हा पुन्हा येऊ लागतात. चेहऱ्याचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे डोळे आणि ते आणखी सुंदर बनविण्यासाठी स्त्रिया थ्रेडिंगचा अवलंब करतात. परंतु, नंतर मुरुमांचा त्रास वारंवार होत असल्याने काही स्त्रिया थ्रेडिंग्स करण्यास नकार देतात. त्वचा संवेदनशील असल्याने ही समस्या उद्भवते. थ्रेडिंगनंतर मुरुमांमुळेही आपण अस्वस्थ असल्यास करा हे उपाय..

भुवयांवर मुरुम का येतात
१) वॅक्सिंग आणि थ्रेडिंग केल्याने, थ्रेडिंग करताना प्लकरचा वापर केल्यास किंवा थ्रेडिंग करताना वॅक्सिंगचा वापर केल्यास ब्रेकआउट होते. यामुळे केसांच्या फॉलिकल किंवा फॉलिकुलिटिस एक समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे भुवयांच्या जागी मुरुम आणि पिंपल्स येतात. हे टाळण्यासाठी आपण एखाद्या चांगल्या त्वचेच्या तज्ज्ञांशी संपर्क साधू शकता किंवा एंटीसेप्टिक क्लीन्जर वापरू शकता.

२) रक्ताभिसरण
मुरुमांचे एक कारण म्हणजे रक्ताभिसरणचा अभाव. व्यायामाद्वारे आणि योगाने आपल्या शरीराचे रक्ताभिसरण योग्य ठेवा. यासोबतच कडूलिंबाचा आणि कारल्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय रात्री झोपेच्या आधी आपला चेहरा धुवा आणि चांगली क्रीम किंवा नारळाच्या तेलाने भुवयांची मालिश करा.

३) भुवयांचा मेकअप
बाजारपेठेत सौंदर्य उत्पादनांमध्ये विविध प्रकारची रसायने आढळतात. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येतात. भुवयांचा मेकअप केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. मेकअप उत्पादने केसांसाठी हानि करक असतात ज्यामुळे पिंपल्स येण्यास सुरुवात होते. यामुळे तेलकट क्लीन्सरने भुवया स्वच्छ करा. तसेच बंद छिद्र उघडण्यासाठी गरम पाण्याच्या स्टीमचा वापर केला जाऊ शकतो.

४) टी-झोन
कपाळ, नाक आणि हनुवटी हे उर्वरित चेहऱ्यापेक्षा अधिक तेलकट असते ज्यामुळे ब्रेकआउट होतो आणि छिद्रांमध्ये घाण साचली जाते ज्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. यापासून मुक्त होण्यासाठी आपल्या स्किनकेअर नित्यक्रमात रेटिनॉलचा समावेश करा.